Vadhu Var Melava 2021 - Pune Swakul Sali Samaj, Pune

"Pune Swakulsali Samaj, Pune” is organizing a meet for finding a suitable match (Vadhu-Var Melava 2021) for future Brides and Grooms Online Only

पुणे स्वकुळ साळी समाज, पुणे आयोजित उपवधू-वर पालक मेळावा २०२१
 
पुणे स्वकुळ साळी समाज, पुणे या संस्थेमार्फत दरवर्षी जानेवारी मध्ये उपवधू-वर पालक मेळावा घेण्यात येतो. यावर्षी करोना महामारीची साथ जगभर चालू आहे. लॉक डाउन आहे. काही शहरामध्ये संचारबंदीही लागू आहे. ही परिस्थिती केव्हा बदलेल हे आता तरी सांगता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जानेवारी २०२१ मध्ये मेळावा करणे शक्य वाटत नाही. 
 
तेव्हा पुणे स्वकुळ साळी समाज, पुणे या संस्थेने असे ठरवले आहे कि, उपवधू-वर पालक मेळावा आयोजित न करता उपवधू-वरांची नोंदणी करून घ्यायची व त्या माहितीची स्मरणिका/बुकलेट तयार करून ते नोंदणी केलेल्या प्रत्येक समाज बांधवाना कुरियरने त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवणे. 
 
यासाठी नोंदणी १५ जानेवारी २०२१ पर्यंत खालील प्रमाणे करता येईल. 
 
१. नाव नोंदणी www.jivheshwar.com या वेब साईटवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. 
२. याशिवाय नाव नोंदणी फॉर्म भरून तो फॉर्म श्री. स्वप्नील जाळींद्रे ९९६०६०४२५१ या whatsapp no. वर पाठविता येईल. याची नोंदणी शुल्क बँकेत बँक चालनाने / RTGS / GPay ची स्लिपची फोटोकॉपी फॉर्म सोबत whatsapp वर पाठवता येईल. 
३. नाव नोंदणी फॉर्म पोस्टाने / कुरियरने पाठवू नयेत ते स्वीकारले जाणार नाहीत फक्त whatsapp द्वारेच स्वीकारले जातील. 
४. नाव नोंदणी शुल्क रु. ३५०/- आहे (कुरियरच्या खर्चासह)
 
तसेच ९०९६०८३६३८ (पंडित मर्ढेकर) व ९९६०६०४२५१, ९९२१४०००२५ (स्वप्नील जाळींद्रे) या दोन whatsapp no. वर फॉर्म मागणी केला तर तो पाठविण्याची व्यवस्था केली जाईल. 
 
तरी वरील निवेदनाची सर्व समाज बांधवांनी नोंद घेऊन यावर्षी पुणे स्वकुळ साळी समाज, पुणे या संस्थेच्या कार्यास सहकार्य करावे, अशी नम्र विनंती!
 

Click here to Register Online for Vadhu Var Melava 2021

भ.श्री.जिव्हेश्वर महाराज यांचे संक्षिप्त चरित्र

Written by जि.कॉम टीम.

श्री व्यास महर्षींनी स्कंद पुराणाची रचना केली. अत्रि ऋषींनी त्याचा गहन अभ्यास केला व त्यांनी संस्कृत भाषेत `साळी महात्म्य' पुराण, ग्रंथ लिहिले. पंडितोत्तम संत भा॑नूदासांनी या ग्रंथाधारे मध्ये हे पुराण ग्रंथ मराठी भाषेत…

Read more: भ.श्री.जिव्हेश्वर महाराज यांचे संक्षिप्त चरित्र

साळी समाजातील विवाह पद्धती, रुढी व परंपरा

Written by प्रा.नरेन्द्र मारवाडे.

विवाह म्हणजे दोन जिवांचे मिलन. भारतीय संस्कृती विवाहाला अनन्य साधारण महत्त्व आहे. असे विवाह पूर्वी हे आपआपल्या जातीतच होत असत. साळी समाजातही हिच रुढी पाळली जाते. साळी समाजाची मूळ शाखा स्वकुळ साळी आहे. त्याच्या पुढे…

Read more: साळी समाजातील विवाह पद्धती, रुढी व परंपरा

साळी हेच नाव का?

Written by प्रा.नरेन्द्र मारवाडे.

साळी या शब्दाचा उत्पत्तीच्या दॄष्टीने अर्थ तो असा: शाल वॄक्षाची साल साळ्णारे ते साळी, किंवा शाली. ही प्रागैतिहासिक काळातील, समाज हा अर्धनग्न व वन्य अवस्थेत असतानाची घट्ना आहे. मानव वनचर असताना वस्त्रे म्हणून या सालीचाच…

Read more: साळी हेच नाव का?

Daily News (मराठी | English | हिंदी)

  • Maharashtra Times
  • Times of India
  • Jagran

Daily News (తెలుగు | ગુજરાતી | ಕನ್ನಡ)

  • Kannada-Webdunia
  • Sandesh
  • Telugu-Webdunia