Vadhu Var Melava 2021 - Pune Swakul Sali Samaj, Pune

"Pune Swakulsali Samaj, Pune” is organizing a meet for finding a suitable match (Vadhu-Var Melava 2021) for future Brides and Grooms Online Only

पुणे स्वकुळ साळी समाज, पुणे आयोजित उपवधू-वर पालक मेळावा २०२१
 
पुणे स्वकुळ साळी समाज, पुणे या संस्थेमार्फत दरवर्षी जानेवारी मध्ये उपवधू-वर पालक मेळावा घेण्यात येतो. यावर्षी करोना महामारीची साथ जगभर चालू आहे. लॉक डाउन आहे. काही शहरामध्ये संचारबंदीही लागू आहे. ही परिस्थिती केव्हा बदलेल हे आता तरी सांगता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जानेवारी २०२१ मध्ये मेळावा करणे शक्य वाटत नाही. 
 
तेव्हा पुणे स्वकुळ साळी समाज, पुणे या संस्थेने असे ठरवले आहे कि, उपवधू-वर पालक मेळावा आयोजित न करता उपवधू-वरांची नोंदणी करून घ्यायची व त्या माहितीची स्मरणिका/बुकलेट तयार करून ते नोंदणी केलेल्या प्रत्येक समाज बांधवाना कुरियरने त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवणे. 
 
यासाठी नोंदणी १५ जानेवारी २०२१ पर्यंत खालील प्रमाणे करता येईल. 
 
१. नाव नोंदणी www.jivheshwar.com या वेब साईटवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. 
२. याशिवाय नाव नोंदणी फॉर्म भरून तो फॉर्म श्री. स्वप्नील जाळींद्रे ९९६०६०४२५१ या whatsapp no. वर पाठविता येईल. याची नोंदणी शुल्क बँकेत बँक चालनाने / RTGS / GPay ची स्लिपची फोटोकॉपी फॉर्म सोबत whatsapp वर पाठवता येईल. 
३. नाव नोंदणी फॉर्म पोस्टाने / कुरियरने पाठवू नयेत ते स्वीकारले जाणार नाहीत फक्त whatsapp द्वारेच स्वीकारले जातील. 
४. नाव नोंदणी शुल्क रु. ३५०/- आहे (कुरियरच्या खर्चासह)
 
तसेच ९०९६०८३६३८ (पंडित मर्ढेकर) व ९९६०६०४२५१, ९९२१४०००२५ (स्वप्नील जाळींद्रे) या दोन whatsapp no. वर फॉर्म मागणी केला तर तो पाठविण्याची व्यवस्था केली जाईल. 
 
तरी वरील निवेदनाची सर्व समाज बांधवांनी नोंद घेऊन यावर्षी पुणे स्वकुळ साळी समाज, पुणे या संस्थेच्या कार्यास सहकार्य करावे, अशी नम्र विनंती!
 

Click here to Register Online for Vadhu Var Melava 2021

Don't insist on English!

Written by जि.कॉम टीम.

Share

इंग्रजी भाषेचा आग्रह करू नका (एक लक्षवेधी टेड टॉक्स व्याख्यान)सध्या जगभरात इंग्लिश ही  एकच भाषा महत्वाची ठरत चालली आहे. पण यामुळे आपण इतर भाषेतील समृद्ध विचार आणि प्रगल्भ कल्पनांना तर दुरावत चाललो नाही ना? बुद्धिमत्ता आणि कल्पकता ही आपल्याला कोणती भाषा येते अथवा येत नाही यावर अवलंबून आहे का? आईनस्टाईन ह्या अग्रगण्य संशोधकाला जर फक्त इंग्लिश भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे संशोधनाची संधी दिली गेली नसती तर आज जग त्याने लावलेल्या असंख्य शोधांपासून वंचित राहिले नसते का?

हा विचार करायला लावणारा प्रश्न विचारतात श्रीमती पॅट्रीशिया रायन - इंग्लिश विषय शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असणाऱ्या एक शिक्षिका.

व्याखानाबद्दल:
दुबईतील TED TALKS मध्ये, अनुभवी इंग्रजी शिक्षिका पेट्रीशिआ रायन हा जिज्ञासा निर्माण करणारा प्रश्न विचारतायत: जगाच्या इंग्रजी भाषेवर असणाऱ्या अतिप्रभावामुळे इतर भाषांमध्ये व्यक्त होणाऱ्या कल्पनांकडे दुर्लक्ष होत आहे काय? (उदा: जर आइनस्टाइनला टोफेल परीक्षा पास व्हावी लागली असती तर?) हा इतर भाषांमध्येही कल्पना मांडू द्याव्यात असा आधार देणारा संवाद आहे.

वक्त्याबद्दल:
श्रीमती पॅट्रीशिया रायन या गेल्या ४० वर्षापासून आरबी देशांमध्ये इंग्लिश शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या दरम्यान त्यांना सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेचे महत्व समजले. सध्या त्या दुबई मधील झायेद विद्यापीठात शिकवत आहेत तसेच कायदेशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. या व्याखानामधून त्या इंग्लिश भाषेप्रमाणे इतर भाषासुद्धा महत्वाच्या आहेत आणि त्या सुद्धा जोपासले गेल्या पहिजेत हा विचार प्रभावीपणे मांडतात.

Note - This information is collected from internet.

Share

Daily News (मराठी | English | हिंदी)

  • Maharashtra Times
  • Times of India
  • Jagran

Daily News (తెలుగు | ગુજરાતી | ಕನ್ನಡ)

  • Kannada-Webdunia
  • Sandesh
  • Telugu-Webdunia