बीडचे श्रीकृष्ण मंदिर (मठ)
साळी समाजाचे गुरू घराणे म्हणून स्वामी रामानंद साळी यांना ओळखले जाते. १६व्या शतकात त्यांनी बीड येथे श्रीकृष्ण मंदिराची स्थापना केली होती. स्वामी रामानंद साळी यांचे आडनाव भागवत. भागवत घराणे हे कृष्णभक्त होते. स्वामी रामानंद साळी आणि त्यांच्या वंशजांनी रचलेले हस्तलिखित साहित्य आजही मंदिरात आहे. ते सर्वच साहित्य दुर्लक्षित आहे.
प्रस्तुत श्रीकृष्ण मंदिराचे मठाधिकारी ह. भ. प. राम जाधव यांच्या हस्ते सर्व धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. मंदिर व मंदिरातील देवदेवता प्राचीन आहेत. प्रस्तुत मंदिर समस्त साळी समाजाचे भूषणं आहे. या मंदिराला ५०० वर्षांचा इतिहास आहे. या घराण्यातर्फे साळी समाजाला गुरूपदेश दिला जात होता. त्यासाठी स्वामी रामानंद साळी यांनी ठिकठिकाणी मठस्थापना केली होती. ते कृष्णभक्त होते. नंद घराण्याची गादी त्यांच्याकडे होती. आजही बीड मध्ये स्थापन केलेल्या श्रीकृष्णमठात त्यांची गादी ह. भ. प. राम जाधव चालवितात. संत स्वामी रामानंद साळी यांनी शके १६१०च्या दरम्यान लिहिलेले हस्तलिखित साहित्य विद्यमान आहे.
संकलन - श्री.लक्ष्मणराव लोणकर
स्त्रोत - 'साळी समाजाचा इतिहास आणि संस्कृती(खंड दुसरा)'या पुस्तकामधून साभार