बेळगावातील एकमेवाद्वितीय भ. जिव्हेश्वर मंदिर
स्वकुळ साळी समाजाचे कुलदैवत भ. जिव्हेश्वरांचे बेळगावातील वडगाव विभागातील मंदिर अनेकार्थाने वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल. या देवस्थानचा लौकिक सर्वत्र झाला असून भ जिव्हेश्वरांची मूर्ती
एकमेवाद्वितीय असल्याची येथे येणाऱ्या भाविकांची प्रतिक्रिया असते. त्याला साजेशी येथील मूर्ती आहे . साळी समाजाची देशातील लोकसंख्या सुमारे पाच लाख होईल . बेळगावात हे साळी वडगाव टापूत एकवटलेले
दिसतात. त्यामुळे हे मंदिर बाजारगल्लीत उभारले आहे. समाजातील काही भाविक पुढारी मंडळींनी शंभर वर्षापूर्वी मंदिर उभारले. २००७ हे त्याचे शताब्दी वर्ष उत्साहात साजरे केले.
मूर्तीची वैशिष्ट्ये
भ. जिव्हेश्वरांचे मंदिरातील मूर्ती संगमरवरी असून सुमारे दोन फूट उंच आहे. इतर ठिकाणच्या मंदिरात भ.जिव्हेश्वर आसनस्थ स्वरूपात दिसतात पण इथली मूर्ती त्याला अपवाद आहे . एका हातात कमंडलू दुसऱ्या हातात शंख आहे मूर्तीचा उजवा डोळा उग्र तर दुसरा शांत ,सौम्य भासतो. शिवाय हि मूर्ती म्हणजे हरी--हर यांचा अनोखा संगम असून हे देवांचे एकीकरण मनाला चटकन भावते. मूर्तीच्या दोन्ही बाजूस माता अकिनीदेवी माता दशकिनीदेवी आहेत. गाभाऱ्यात श्री गणपती ,ईश्वरपिंडी, नंदी आहे,श्री बाळाराम दशरथ धोत्रे. यांनी शंभर वर्षा पूर्वी जिव्हेश्वरांची सुंदर मूर्ती राजस्थानातून आणली असून आजही ती देवस्थानात भाविकांना दर्शन देत उभी आहे . मूर्तीला सोन्या चांदीचे मोहक असे मुगुटही आहेत . मंदिरामागे समाजाने सुंदर मंगल कार्यालय बधले आहे.
टीप - हि माहिती साळी समाजाचा इतिहास आणि संस्कृती (खंड दुसरा) या पुस्तकातील आहे.
संपादन -- डॉ. नरेंद्र मारवाडे
संकलन -- श्री. ल. रा लोणकर