×

Error

The template for this display is not available. Please contact a Site administrator.

श्री जिव्हेश्वराची स्तुती

Share

विश्वात सर्वत्र असता विवस्त्र | देखोनी द्रवला हृदयी त्रनेत्री || जिव्हेतुनी पुत्र निर्माण केला || नमस्कार त्या प्रिय जिव्हेश्वराला ||१|| सदा सर्वदा देव अंकित ज्याचे | जरा ध्यान ते नित्य जिव्हेश्वराचे || जयाचे कृपे लाभले वस्त्र सकला | नमस्कार त्या प्रिय जिव्हेश्वराला ||२|| कटी केशरी वस्त्र पितांबराचे | प्रकाशे तनु तेज हि कुंडलाचे || शिरी मुकूट शोभे गळा रुद्रमाळा | नमस्कार त्या प्रिय जिव्हेश्वराला ||३|| जयाने सुरा लाविले नित्य कामा | महेशा, रवि, चंद्रमा, विष्णु ब्रम्हा || असा थोर महिमा पुराणी रचियेला | नमस्कार त्या प्रिय जिव्हेश्वराला ||४|| करोनी असंख्यात वसने तयार | सुती रेशमी भरजरीची अपार || जयाचे कृती लाभ जगतासी झाला | नमस्कार त्या प्रिय जिव्हेश्वराला ||५|| विधी निर्मिती श्रीहरी अन्नदाता | सदाशिव हा सृष्टी सहार कर्ता || तसा स्वकुळ जो वस्त्रदाता जगाला | नमस्कार त्या प्रिय जिव्हेश्वराला ||६|| श्री जिव्हेश्वर भगवान की जय ||

Share