स्वकुळ धारा - भाग ९
भ. जिव्हेश्वरपुञ कैलासभुवन यांना राजा सुभानु यांनी नेले.
माळवा देशाचा राजा सुभानु मोठे शिवभक्त होते तसेच ते दररोज इंद्रदेवानां शिवपुजेसाठी विमानाने बेलफुले स्वर्गात नेउन देत आसे त्यामुळे इंद्रदेव त्यांच्या वर प्रसन्न आसत.
सुभानु यांची भेट स्वर्गात वस्त्र विणण्यास बसलेल्या श्री कैलासभुवनांशी झाली त्यांनी विणलेले सुंदर व भरजरी वस्त्रे पाहुन राजा सुभानु यांनी इंद्रदेवानां त्यांना माळवा देशासाठी वस्त्र विणण्यास देण्याची विनंती केले.
इंद्रदेवानीं भ शंकरांच्या परवानगीने श्री कैलासभुवन यांना राजा सुभानुस सुपुर्त केले व त्यांना आपली दोन्ही मुले स्वर्गात ठेवण्यास सांगितले पण कैलासभुवनांनी त्यांच्या शब्दांचा आव्हेर केला म्हणून त्यांच्या शाखेला आहेर साळी म्हणु लागले.
पुढे ही शाखा सकुळ साळी शाखेत विलीन झाली
(संदर्भ--- आध्याय १९ अोवी १५२ ते आध्याय २० अोवी ५२)
॥ हर हर जिव्हेश्वर॥
. . . . . . . . . . . . ( क्रमशः)
संकलन
श्री. अमोल कविटकर, पुणे