महापरिषदा / अधिवेशने
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच थोड्या संपन्न झालेल्या आहेत. पहिली महापरिषद हुबळी येथे १९१६ मध्ये संपन्न झाली होती. त्यानंतर आतापर्यंत केवळ १२ महापरिषदा संपन्न झालेल्या आहेत.
पहिली महापरिषदः हुबळी - १९१६
संपूर्ण भारतात साळी समाजाचे अस्तिस्व केवळ दक्षिण भारतातच आहे. महारस्ष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्या प्रदेश आणि गुजरात आदी राज्यांत साळी समाज राहत असुन या रात्यांतील साळी समाजाला संघटित करण्याचे कार्य या महापरिषदांनी घडविले आहे. विशेष म्हणजे या पाचही राज्यातील साळी बांधवांना मराठी भाषेचे ज्ञान आहे. या राज्यातील साळी बांधव त्या त्या प्रांतातील प्रचलित भाषा बोलत असले तरी प्रचीनकालीन मराठी भाषेचे अस्तित्व हे साळी बांधव विसरलेले नाहीत. एवढेच नव्हे तर साळी संस्कृतीचे इतरही अनुबंध त्यांच्या ठायी आहेत. महाराष्ट्रातील कुलदैवते खंडोबा, कुलस्वामिनी तुळजापुरची भवानी, सोनाईचा भैरोबा, पीर आणि भ. जिव्हेश्वर उत्सवाची परंपरा व इतर सर्व हिंदू सण-उत्सव साजरा करणारा हा साळी समाज आपल्या परंपरा जतन करुन आहे व पारंपारिक साळी व्यवसाय विणकाम विसरलेला नाही. काळाच्या ओघात व परिस्थितीनुसार साळी समाजात अनेक परिवर्तने झालेली आहेत. परिवर्तनशील असा हा साली समाज आहे. कलापरंपरेत तर त्यांचा हातखंडा आहे. गिनिज बुकमध्येही साळी बांधवांची नावे झळकली आहेत. पेशवे काळात साळी समाजावर जे जातीय अन्याय झाले होते ते सुधारण्याचे काम या महापरिषदांनी आवर्जून केले असेच म्हणावे लागेल.
या महापरिषदांचा उद्देश जाती सुधारणेसाठी संघशक्तीने काम करण्यासाठी एकत्र आलेली मंडळी असा आहे. पहिल्या महापरिषदेत प्रस्तुत उद्देश समोर ठेवूनच हुबळी येथे १९१६ मध्ये महापरिषद भरवण्यात आली होती. हि महापरिषद श्रीकृष्णाप्पा ढगे बागलकोट नियोजित श्री. खंडाप्पा मातृभाई, बंगलोर यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली होती. यावेळी हुबळीचेच श्री मलप्पा गंगाधरप्पा दिवटे हे स्वागताध्यक्षपदी होते. ही पहिलीच परिषद असल्यामुळे संपुर्ण भारतातील साळी समाजाला निमंत्रण जाणे शक्य नव्हते. कारण अजुन समाज संपुर्णतः संघटित झालेला नव्हता; परंतु या पहिल्या महापरिषदेने समाजाच्या संघटन कार्यासाठी उचललेले हे पहिले पाऊल निश्वितच स्वागतार्ह होते.
या महापरिषदेत पुढिल ठराव मंजुर झाले ते असे:
१) पंढरपूर येथे जागा मिळवून साळी समाजाची धर्मशाळा बांधावी.
२) काशी येथे भ.जिव्हाजी महाराजांच्या मुळपिठावद्दल विचारपुस करणे.
३) भ.जिव्हाजी महाराजांचा जन्मउत्सव प्रतिगावी व्हावा.
४) ठिकठिकाणी स्वकुळ साळी समाजाचा गुरु नेमून घेणे.
५) श्री.क्षेत्र ऐरणी येथील स्वामींचा पट्टाभिषेक व्हावा.
६) प्रत्येक साळी बंधुंनी यज्ञोपवित धारण करावे.
७) दैविकांचे हासिक-मासिल (लग्न देणे-घेणे) सर्व गावी सारखेच असावे.
८) दैविकांचे रक्कम पंचमी सत्मर्माकडे खर्च करावी.
९) लग्नात अ-वाजवी खर्च कमी करणे.
१०) कोणीही कन्या विक्रय करु नये. माल घेउ नये.
११) आपल्या मुलांना दुर्व्यसनापासून परावृत्त करावे.
१२) प्रत्येक गावी विद्याफंड योजना असावी. मुला,मुलींना शिकवा.
१३) मुला मुलींचे बालविवाह करु नका.
१४) समाजात ऐक्यमत वाढवावे, संघमुनती वाढवावी.
स्त्रोत - साळी समाजाचा इतिहास आणि संस्कृती (खंड पहिला) व अखिल भारतीय स्वकुळ साळी समाजाच्या संकेतस्थळावरुन साभार.