विशेष मागासवर्ग प्रवर्ग जन जागरण अभियान
आपण विशेष मागासवर्ग प्रवर्ग जन जागरण अभियान राबण्याचे ठरवले आहे. विशेष मागास प्रवर्ग यात सध्या तरी स्वकुळ साळी, पद्म साळी, देवांग कोष्ठी यांचा सहभाग मोठा आहे.
अभियानाचा उद्देश हा जन जागरण अभियान व जन जागृती करणे हा आहे. व त्यासाठी खालील उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल. तशेष मान्यवरांच्या सूचानाचे स्वागत करण्यात येईल . मात्र नुसत्या सूचना नसाव्यात. योजना व कार्यवाहीचा आराखडा आर्थिक नियोजनासह असावा हि नम्र विनंती.
१) मिळत असणाऱ्या सवलतीचा जास्तीजास्त उपयोग करणे.
२) आवश्यक असणाऱ्या सवलतीची मागणी करणे.
३) महाराष्ट्रात विशेष मागास प्रवर्ग यात समाविष्ट असणाऱ्या जाती जमातीमध्ये ऐक्य साधने.
४) विशेष मागास प्रवर्ग यात समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा नाव व mobile no.ची यादी तयार करणे.
५) विशेष मागास प्रवर्गातील तरुण आणि तरुणी तशेष विद्यार्थी आणि विद्यार्थिनी याचा जन जागृती मोहिमेत नुसता सहभाग नव्हे तर नेतृत्व निर्माण करणे.
६) e -media व mobile या बाबत जन जागृती करणे व याचा वापर करून जन जागरण अभियान यशस्वी करणे विशेषत: संगणक facebook email ब्लॉग यांचा वापर वाढवणे.
७) जेथे विशेष मागास प्रवर्ग यांची लोकसंख्या जास्त आहे अशा शहर व गावामधून संघटन मजबूत करणे व विशेष मागास प्रवर्ग सेल स्थापन करणे.
८) प्रवर्गातील गुणवत्ता धारक विद्यार्थी/विद्यार्थिनी, तरुण/तरुणी उच्च पदस्थ व्यक्तींचा,सामाजिक समाज धुरिण व असे उच्च पदावरून निवृत्त झालेल्या व्याक्तीचा सन्मान करणे.
९) सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहित करणे व त्यांचा योग्य सन्मान करून त्यांना सहकार्य करणे.
१०) विद्यार्थी व तरुण/ तरुणी यांना प्रोत्साहित करून त्यांची गुणवत्ता व आर्थिक स्थर उंचावणे.
तेव्हा या निवेदनाव्दारे मी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण आणि तरुणी विशेष सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीं उच्च पदस्थ व्यक्तीं,सामाजिक पदाधिकारी / सामाजिक कार्यकर्ते उच्च पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्ती यांना विनंती करतो कि, ह्या प्राथमिक स्थरावर आपआपले वैयक्तिक मतभेद विसरून मान सन्मान याचा विचार न करता विशेष मागास प्रवर्ग यांचे भवितव्य उज्जल करण्यासाठी हे अभियान यशस्वी करू या. यासाठी कार्य करू इच्छिणाऱ्या सर्व व्यक्तींनी विशेषत: e-media चा वापर करणाऱ्या तरुण तरुणी व विद्यार्थी विद्यार्थिनी हे निवेदन सर्व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तीपर्यंत पोहचेल हे पाहावे.
प्राथमिक स्थरावर कार्य करू इच्छिणाऱ्या सर्व व्यक्तींनी आपले नाव , email id mobile no. माझ्या मोबाइलवर sms करून कळवावा.
Emailid:
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
, mobile no. 9987052901/9405362813/9420708513.
माझा असा विश्वास आहे कि, हे कार्य विद्यार्थी विद्यार्थिनी व तरुण तरुणीच करू शकतील नव्हे त्यांना हे करावेच लागेल कारण हि काळाची गरज आहे मिळत असणाऱ्या सोयी व सवलती आणि मिळवावायाच्या सोयी व सवलती यांचा उपयोग तुमचे भविष्य उज्जल करण्यासाठीच होणार आहे. आम्ही फक्त आम्हास ह्या सोयी सवलतीचा फायदा झाला आहे. व त्याचे उत्तरदायित्व म्हणून हा प्रयत्न आहे.
आपणास विशेष मागास प्रवर्ग यात न हि मोहीम success करावयाची आहे व त्यासाठी तुमचा सारख्या तरुणांनी एकत्र येणे आवश्यक आहे. व संगणक आणि mobile फोन याचा वापर करून जन जागृती करावयाची आहे. आपणास तरुण वर्ग व विद्यार्थी वर्ग यांना प्रोत्साहित करून हे कार्य करावयाचे आहे.
हे प्राथमिक स्थरावरील निवेदन आहे. विशेष मागासवर्ग प्रवर्ग यात समावेश असणाऱ्या सर्व जाती जमाती मधील कार्यकर्त्यांचा समावेश करून विशेष मागासवर्ग प्रवर्ग जन जागरण अभियान समिती स्थापण करण्यात येणार आहे. गैरसमज नसावा हि विनंती
आपला नम्र,
म. न. ढोकळे (सर)
उपाध्यक्ष विशेष मागासवर्ग प्रवर्ग अन्याय निवारण कृती समिती महाराष्ट्र व
प्रमुख निमंत्रक विशेष मागासवर्ग प्रवर्ग जन जागरण अभियान