भगवान श्री जिव्हेश्वर प्रवचन माला संपन्न
येवला (जि. नाशिक ) :- दि. १५ ऑक्टो. २०१५ ते २० ऑक्टो. २०१५ पर्यंत नवरात्रौत्सवात प्रथमच " भगवान श्री जिव्हेश्वर प्रवचन माले " चे आयोजन मारुती मंदिर, कोटमगाव, येवला (जि. नाशिक ) येथे करण्यात आलेले होते.
दि १५ गुरुवार रोजी श्री. सुभाष गं. केकाणे ( अंदरसूल ) यांचे साळी संत : टण्णू महाराज ( जुन्नर ) यांचे चरित्र व संदेश यावर प्रवचन झाले. “ परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम !! धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे !! ” या गीतेवरील श्लोकावर निरुपण करून टण्णू महाराजांचे चरित्र व संदेश विषद केला. श्री दिलीप भावसार, श्री मधुकर सरोदे, सौ छाया सरोदे इ. उपस्थित होते. श्री केकाणे यांचे श्रीफळ देवून श्री बाबुराव नागपुरे यांनी आभार मानले. दि.१६ शुक्रवारी सौ. विमलताई पाठक (नगर) यांचे "वारकरी संप्रदाय : संतांचे योगदान" या विषयावर प्रवचन झाले. त्यावेळी " म्हणोनि जाणतेनो गुरु भजिजे ! तेणे कृत कार्य होईजे !! जैसे मूळ सिंचने सहजे ! शाखा पल्लव संतोषती !! " वर विवेचन करतांना गुरुचे महत्व स्पष्ट केले. श्री संजय अंबादास काटकर, श्री भरत विजयलाल शेकटकर , श्री सुभाष केकाणे, सौ. विजया शेकटकर इ. समाजबांधव उपस्थित होते. सौ. विमलताई पाठक यांचे श्रीफळ देवून सौ. आशा केकाणे यांनी आभार मानले. दि.१७ शनिवार रोजी श्री. जगन्नाथ एलगट (नाशिक) यांनी " संत कृष्णासा बाकळे, संत मल्हारसा कुक्कर व संत ढगे महाराज (येवला) यांचे चरित्र " यावर विवेचन केले. त्यावेळी "सद्गुरु वाचूनि सापडेना सोय ! धरावे ते पाय आधी आधी !! आपणा सारखे करिती तात्काळ ! नाही काळ वेळ तया लागी !!" या संत वाचनाचे महत्व सांगितले. येवले गावाचे धार्मिक व स्वातंत्र्य चळवळीतील योगदान सांगितले. येवले येथील क्षत्रिय समाजातील संत कृष्णासा बाकळे, संत मल्हारसा कुक्कर व कोष्टी समाजातील संत ढगे महाराज ह्या बहुजन समाजातील संतांनी ज्ञानाचा, समानतेचा व प्रबोधनाचा मार्ग दाखविला असून त्याचे पालन करून मानवी जीवन कृतार्थ करावे असे त्यांनी सांगितले. त्यावेळी श्री सुदामशेट सरोदे, श्री भांगे, श्री भगवान धारणकर, श्री चंद्रहास काळे, श्री नारायणसा कोकणे, श्री रमाकांत रा. भावसार हे उपस्थित होते. श्री एलगट यांचे श्रीफळ देवून श्री अरुण लचके यांनी आभार मानले. दि.१८ रविवार रोजी श्री प्रकाश दिवाणे यांचे " संतांचे योगदान " या विषयावर प्रवचन झाले. त्यांनी संत ज्ञानेश्वर यांचे पासून साळी संत झिपरू अण्णा महाराज, संत साळी बाबा यांचे धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान सविस्तर विषद केले. त्यावेळी श्री अनिल माधवराव दिवाणे, सौ मंगला दिवाणे, श्री सुदाम बदमोरे, किशोर रोडे, कैलास येलगट, सौ. मयुरी येलगट हे उपस्थित होते. श्री अशोक मांजरे यांचे श्रीफळ देवून श्री अनिल गोसावी यांनी आभार मानले. दि.१९ सोमवार रोजी श्री अशोक मांजरे (वैजापूर) यांचे " भगवान श्री जिव्हेश्वर चरित्र व संदेश " या विषयावर प्रवचन झाले. त्यांनी भगवान श्री जिव्हेश्वरांचे चरित्र प्रभावीपणे श्रोत्यांपुढे मांडले. त्यावेळी श्री दिलीप मारवाडी,श्री प्रभाकर बागुल इ. उपस्थित होते.
श्री अशोक मांजरे यांचे श्रीफळ देवून श्री अनिल गोसावी यांनी आभार मानले. घटी बसलेल्या भाविकांच्या आग्रहाखातर हनुमान मंदिराचे पुजारी स्वामी मल्लिकार्जुनदास यांचे दि. २० मंगळवार रोजी
प्रवचन ठेवण्यात आले. त्यांनी " मनुष्य जन्म हा दुर्लभ असून तो मांसाहार व मद्य प्राशनापासून दूर ठेवावा " असे आग्रही प्रतिपादन केले. त्यांचा सत्कार श्री सुधीर एरंडे यांनी केला. यावेळी लक्ष्मणराव तोडकर, ओमकारराव शेकटकर, श्री विनायक आहेर, सौ. विभावरी आहेर, श्री देविदास शहारे, सौ.विद्या शहारे, श्री सुनील मारवाडी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशश्विते करिता श्री कैलास खिंडारे, राजेंद्र सोनवणे यांनी योगदान दिले तर भोजन व्यवस्था श्री मारुती पावडे, संजू सासे, बाळू सासे, नंदू माथेकर यांनी पहिली.
माता अंकिनी -दशांकिनी महिला मंडळाचे भजन संपन्न
येवला (जि. नाशिक ) :- कोटमगाव येथील नवरात्रौत्सवात अहमदनगर येथील माता अंकिनी -दशांकिनी महिला मंडळाचे भजन दि १८ ऑक्टो. २०१५ रविवार रोजी झाले. श्री सुदामशेठ शेकटकर यांचे सहकार्याने व ह.भ.प. सौ. विमलताई पाठक यांचे नेतृत्वाखाली महिलांनी भजन, व्दंद गीत, नृत्य, भारुड, जोगवा सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. गायन व नृत्यात सौ. सिमा सुहास पाठक, श्रीमती चंद्रकला प्रभाकर सद्रे, सौ. स्नेहल चंद्रकांत कौसल्ये, पुष्पलता पंकज सरोदे, विद्या अनिल कांबळे, सुषमा विष्णुपंत साळी, कमल सुभाष अष्टेकर, नलिनी जयकुमार कनोरे यांनी सहभाग घेतला तर तबल्यावर श्री दत्तात्रय भीमराव भुलभुले यांनी साथ दिली.
संकलन :- श्री जगन्नाथ एलगट (साळी)