कोल्हापूर - समाजबांधवांची मोफत निवासाची सोय
स्वकुळ साळी समाज कोल्हापूर शहर या संस्थेचे वतीने श्री.महालक्ष्मी, श्री.ज्योतिबा, श्री.दत्त्त आणि पर्यटनासाठी करवीर काशीत येण्यार्या समाज बांधवांकरीता मोफत निवासाची सोय करण्यात आलेली आहे.
बाहेर गावाहून येणार्या समाजबांधवांसाठी निवासाची सोय विनामुल्य व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबवत असलेले समाजाचे अध्यक्ष श्री. उदय दुधाणे यांनी सांगितले.
इच्छुकांनी पूर्व सुचना देऊन बुकिंग करावे व गैरसोय टाळावी. अधिक माहितीसाठी ९६२३६९७३३८ - स्वामी यांच्याशी संपर्क करावा.