नियोजित वास्तु-पुणे स्वकुळ साळी समाज,पुणे
पुणे स्वकुळ साळी समाज, पुणे या संस्थेने पुणे (कोंडवा बु. ||) येथे नऊ गुंठे जागा खरेदी केली आहे. त्या जागेवर भव्य वास्तू बांधण्यात येत आहे.
या वास्तू मध्ये हॉल (कार्यालय), डायनिंग हॉल, विद्यार्थी वसतिगृह व श्री. भगवान जिव्हेश्वर मंदिर बांधण्यात येत आहे. या वास्तूचे बाह्य चित्र जेवढे देखणे आहे, तेवढ्याचं अंतर्गत सुविधाही उत्तम होणार आहेत.
एकूण बांधकाम ५४४० स्केअर फुटाचे आहे. त्यामध्ये हॉल ३००० स्केअर फुटाचा आहे त्यामध्ये ५००-६०० ची आसन व्यवस्था राहणार आहे. याशिवाय विद्यार्थी वसतिगृह दुसर्या व तिसर्या मजल्यावर होणार आहे. त्यासाठी एकूण १५ रूम्स राहणार असून त्यामध्ये ५० ते ६० विद्यार्थ्यांची निवासाची सोय होणार आहे. तसेच डायनिंग हॉल २७०० स्केअर फुटाचा होणार आहे.
वरीलप्रमाणे सुसज्ज वास्तू बांधण्यासाठी आपल्या समाजातील आर्किटेक्ट श्री. अतुल चं. दिवाणे व सौ. तृप्ती अ. दिवाणे यांची नेमणूक केलेली आहे. वास्तू बांधकामाचा आराखडा पुणे महानगरपालिकेमध्ये सादर केलेला आहे. या बांधकामासाठी अंदाजे १. ०० कोटी खर्च येणार आहे.
ह्या आपल्या वास्तू बांधकामामध्ये प्रत्येक समाज बांधवाचा सहभाग असावा. मोठमोठ्या देणग्या समाज बांधव देत आहेत व देतीलही. परंतु प्रत्येक समाजबांधवास ही वास्तू माझ्या देणगीतून उभी राहिली आहे असे अभिमानाने सांगता यावे म्हणून प्रत्येक कुटुंबाने किमान रु. १०, ०००/- देणगी द्यावी अशी आमची आग्रहाची विनंती आहे.