असे काही तरी...
असे काही तरी लिहावे
कि पुसता येईना म्हणून
काळाने सुध्दा रडावे ||१||
असे काही तरी रेखाटावे
कि आपलीच किमया पाहून
काळाने सुध्दा हसावे ||२||
असे काही तरी करावे
कि सगळीकडे सांगत
काळाने सुध्दा फिरावे ||३||
असे काही तरी आळवावे
कि आपलीच तान ऐकून
काळाने सुध्दा डुलावे ||४||
असे काही तरी विणावे
कि सुखात पांघरून
काळाने सुध्दा झोपावे ||५||
पुणे.