कारकुनाची दशा
बेसीक पगार एकशे पंधरा
म्हणती लोक पगार बरा
मिळून मिसळून पगार सारा
पुरतो जीवनाचा करण्या गुजारा
एक तारखेस पाहतो वाट
पैशाला वाटा असती साठ
कशीबशी खर्चाला मारतो गाठ
व्यसनेही असती भरमसाठ
सर्वांनी करता बेरीज
गुणाकार इंन्क्रीमेंट खेरीज
भागून सार्याचे देणे
वजाबाकी राहते, अधिकच देणे...!
१५-६-१९७२ (सोलापूर)