महागाई
महागाई महागाई महागाई
गाऊ तुला कशी अंगाई
तुला मोठ्ठं होण्याची घाई
सर्वांमुखी तुझी अंगाई
कलेकलेने वाढणारी
आता १००% ने वाढणारी
सामान्यांना न परवडणारी
सर्वांना आणते घाईला
आत टी.व्ही.प्रसाराने
तुझी होई प्रसिध्दी
कोणासही नव्हती तू परिचित
आता आबालवुध्दा परिचित
गरीबांना दररोज चणचण
घाम गाळुनि फिरली वणवण
त्यांना तुझी ओळख कुठली?
पोटाचे खळगे भरणे हीच त्यांची दिवाळी...!