'राज' हट्ट
राठी असे आमुचा बाणा, भारत देशाचा कणा
असे परप्रांतियाचा भरणा, सहिष्णुता आमुची करुणा
मराठीसाठी 'राज' हट्ट, महाराष्ट्र झाला निगरगट्ट
झाली भारी बकाल भरती, महाराष्ट्रीयांची झाली ओहोटी
ज्यांनी त्यांनी यावे महाराष्ट्रात जगावे, मस्त लुटावे
उंट जसा तंबूत, अरब बाहेर
मराठी माणसांस परक्यांचा आहेर
तुमचे आमुचे भागले मराठी ओरडू लागले
परकीयांना घाला बंदी, चालणार नाही तुमची चांदी
मराठीस नाही काम, आम्ही तरी का सहन करावा परप्रांती
परप्रांतियाचा ओघ बेफाम
ऊठ मराठ्या बन कणखर, तू ही राज्यात जाऊन इतर
हो राकट, शिकीव धडा, वाजीव चौघडा
फडकू दे भगवा, मिरीव वाहवा
पण भारताचे संविधान
भारतीय कोठेही जगणार
त्यास सहिष्णुतेचा आधार
आपण सारे भारतीय
नको अडसर राजकीय
नको 'लालु' हट्ट अन् 'राज' हट्ट
निधड्या छातीने करु स्वागत
जगा अन जगू द्याचा मंत्र जागवू
विनंती एकच, नका कोणा दुखवू....!
१८-२-२००८ (बार्शी)