संग प्रीतीचा
पाहुनि प्रथम तुला
डोळ्यांची चाहूल डोळ्याला
भाव मनीचा मनी जाणला
ओळखीचीच वाटली तू मला
बोलणे तुझे पाहुन मनमोकळे
जीनवदोर तुज हाती देऊन, व्हावे मोकळे
प्रेमळ मनाची मज केवळ आस
देशील प्रेम हाक माझ्या मनास
कधी येशील मम जीवनी
सोड पाहू येण्याचे स्वप्नी
तुझा माझा हा संग प्रीतीचा
खरंच गं आहे जन्मोजन्मीचा...!
२३-२-१९७३ (पंढरी)