×

Error

The template for this display is not available. Please contact a Site administrator.

जीवन जगण्याची प्रेरणा !

Share

अनंताकडून अनंताकडॆ–अखंड प्रवास !
कोणाला धार्मिक ग्रंथांच्या वाचनामुळे, कोणाला तत्त्वज्ञानावरची पुस्तके वाचून, कोणाला महाभारत,रामायणासारखे ग्रंथ वाचून तर कोणाला विपश्यना,सत्संग,ध्यान-धारणा इ.मधून आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. जीवनात येणार्‍या संकटाना समर्थपणे सामोरं जाण्याचं बळ मिळतं.महाभारत,रामायण यातील एकेक व्यक्तिरेखा म्हणजे एकेका तत्वाचा आदर्श. त्यांचं जीवन अभ्यासून प्रेरणा घ्यावी आणि आपलं जीवन उजळून टाकावं. आपल्या जीवनात येणार्‍या अडीअडचणींना कसं सामोरं जावं याचं मार्गदर्शन या व्यक्तीरेखांचं जीवन अभ्यासल्यामुळे मिळते.

अगदी असाच प्रकार शिरूर ता.वैजापूर जि.औरंगाबाद च्या निवृत्ती काळे नावाच्या व्यक्तिच्या बाबतीत घडला.[संदर्भ: २ मार्च १० चा सकाळ-सप्तरंग]. अपमानास्पद वागणूक,अवहेलना,सामाजिक कुचंबना यांच्या वारंवार हॊणार्‍या आघातामुळे ते निराशाग्रस्त,दुःखी कष्टी झाले होते. स्वतःच्या जीवनाचा तिटकारा वाटत वाटू लागला होता. मनाच्या अशा निराशाजनक अवस्थेत त्यांच्या हाती मृत्युंजय हे पुस्तक पडले. त्यांनी ते वाचले नव्हे अभ्यासले आणि त्यांचे जीवन आमुलाग्र बदलले.

मृत्युंजय मधील अश्वत्थामा आणि कर्ण यांच्या संवादाचा त्यांच्या मनावर अतिशय खोलवर परीणाम झाला. प्राचीन विष्णुमंदिराजवळ घडलेल्या ह्या प्रसंगात अश्वत्थामा कर्णाला उद्देशून म्हणतो —-”मंदिराच्या माथ्यावर पाषाणाच्या निरुंद फटीत उगवलेलं ते रोपटं बघ ! आपली लुसलुसीत लाल पानं हलवून सांगत आहे की, या पाषाणाच्या माथ्यावर पाय देऊन मला जगायचं आहे.प्रतिकूलतेच्या पाषाणाला एक साधं रोपटंसुद्धा निसर्गात शरण जायला तयार नाही आणि मानव मात्र—-” हे वाचून काळे याना आपलं जीवनही या रोपट्यासारखंच आहे असं जाणवलं आणि या संकटाना धैर्यानं सामोरं जाण्याचा त्यानी मनोमन निर्धार केला. त्यांचं मन उल्हसीत झालं. निराशेतून मुक्त झालं.

मृत्युंजय मधील ”मानवी जीवनाला दवबिंदूची उपमा देणार्‍या प्रसंगानेही त्यांच्या मनावर चांगलाच ठसा उमटवीला. ” जे जीवन मिळवण्याचा अधिकार नाही,ते गमावण्याचाही अधिकार नाही. आत्महत्या म्हणजे भावनाविवश मनाचा आत्म्यावर सरळ बलात्कार होय. —अशानी सहनशील धरतीकडे पाहावे.तिच्यासारखी असंख्य आघात सहन करण्याची स्वतःची शक्ती वाढवावी.शाररिक,सांपत्तिक व लौकिक नव्हे तर आत्मिक आणि योग्य वेळ येताच अनंतात विलीन होऊन जावे. कारण कुणीही कधीच विसरु नये, की काळ अखंड आहे.—जीवन ही भीक मागून मिळणारी वस्तू नव्हे. जीवन म्हणजे पूर्णत्वासाठी अनंताकडून अनंताकडे चालू असणारा अखंड प्रवास आहे—.” असं अश्वत्थामा कर्णाला उद्देशून म्हणतो.

या दोन प्रसंगानी श्री.काळे यांच्या मनावर सकारात्मक परीणाम झाला आणि त्यांना जगण्याची,संघर्षाची,आनंदाने जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली.या निमित्ताने जून इ.स.२००० मध्ये लिहिलेली  कविता[  ]मला प्रकर्षाने आठवली.

- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
लेखन - श्री.पुरुषोत्तम कुलकर्णी यांच्या सावधान या ब्लॉग मधून साभार. तुमच्या प्रतिक्रिया लेखकाला जरुर द्याव्यात.

Share