ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...
नुकतीच सर्व घराघरांमध्ये दिवाळी आनंदात आणि पुर्ण उत्साहात साजरी झालेली आहे. आता बहुतांशी घरामध्ये लग्न जमविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असतील किंवा काही घरात लग्नाच्या तारखाही निश्चित झालेल्या असतील. याच दरम्यान आज १५ नोव्हेंबर २०१० रोजी आम्ही एक नविन विभाग सुरु करत आहोत तो म्हणजे "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी". आपल्याला माहित आहे कि ज्योतिष हा विषयच सर्वांना उत्कंठा लावणारा आहे. आणि भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळेच आपण घरामध्ये कोणते शुभ कार्य असो, काही नविन वास्तु घेणे, बांधणे असो, जीवनातील काही अडचणीसाठी मार्गदर्शन असो तेव्हा आपण ज्योतिषाकडे हमखास जातोच.
पण तत्पुर्वी आपणालाही काही गोष्टींची माहिती असणे हे उत्तम. त्यामुळे जिव्हेश्वर.कॉम टीमने लेखक श्री. प्रकाश घाटपांडे, पुणे. यांच्याशी संपर्क साधून त्याच्या दोन पुस्तकातील मजकुर येथे प्रकाशित करण्यासाठी परवानगी मिळविलेली आहे. त्याच्या एका पुस्तकाचे नाव "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...." आणि दुसर्या पुस्तकाचे नाव "यंदा कर्तव्य आहे" असे आहे. याचा सर्व समाजबांधवांना नक्कीच लाभ होईल याची आम्हाला खात्री आहे. तसेच श्री. प्रकाश घाटपांडे यांची पुस्तके इतरत्रही अन्य संकेतस्थळावर प्रकाशित झालेली आहेत. पण आपल्या समाजबांधवांना येथे लाभ घेता यावा म्हणून आम्ही येथे प्रकाशित करीत आहोत. जिव्हेश्वर.कॉम टीम कडून श्री. प्रकाश घाटपांडे याचे मन:पुर्वक आभार.
Wednesday, 05 June 2013
"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण" या ग्रंथाची... Read More...
Wednesday, 05 June 2013
साळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...
Monday, 10 June 2013
अखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...
Tuesday, 26 August 2014
साहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...
Tuesday, 26 July 2016
Telangana State Swakul Sali Samaj ESTABLISHED ON 01-11-2015. Office address: Door No. 8-5-54, Jivheshwar Bhavan, Dhanalaxmi Colony,... Read More...
Monday, 10 June 2013
स्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...