जिव्हेश्वर.कॉम डिजीटल विश्वकोश हा साळी समाजाचा जगातील सर्वात पहिला मराठी डिजीटल विश्वकोश आहे. येथे समाजातील अनेक स्तरातील माहिती एकत्रित करण्याचा जिव्हेश्वर.कॉम टीमचा संकल्प आहे. आजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आपल्याला हवी ती समग्र माहिती लवकरात लवकर कुठे व किती वेळात मिळू शकेल हे सांगणे थोडे कठीणंच जाईल. त्यामुळेच जिव्हेश्वर.कॉम डिजीटल विश्वकोशाच्या निर्मितीचा विचार आमच्या मनात आला आणि तो आपण सर्वांनी एकत्र येऊन सत्यात उतरावयाचा आहे. जिव्हेश्वर.कॉम डिजीटल विश्वकोशाच्या प्रगतीसाठी आम्ही विविध विषयांना अनुसरुन वेगवेगळे मुख्य विभाग आणि उप-विभाग सुरू केलेले आहेत. तुमचे अनुभव, समाजाची माहिती यांच्या आधारे लेखन करता यावे, विचारांची देवाणघेवाण करता यावी यासाठी जिव्हेश्वर.कॉम डिजीटल विश्वकोश हे एक समाजासाठी व्यासपीठ व्हावे अशी आमची आकांक्षा आहे. यासाठी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पाठवलेली माहिती हि समाजउपयुक्त व प्रमाणसिध्द असावी. जगात तुम्ही कोणत्याही कानाकोपर्यात बसलेले असाल तरीही तुम्हाला समाजातील सद्य स्थिती, कार्यक्रम, उपक्रम, कार्यालये, ज्ञातिगृहे, महिला-वृत्तांत इत्यादींची माहिती काही क्षणातच मिळू शकेल. असा हा खर्या अर्थाने साळी समाजाचा विश्वकोश आहे.