आवाहन

Share

जिव्हेश्वर.कॉम हा साळी समाजाचा विश्वकोश अजून प्रथमावस्थेत आहे. येथील सर्व विभागांमध्ये जेवढी माहिती भराल तेवढी कमीच आणि एकाचवेळी एवढी माहिती ठेवणेही अशक्य. परंतु इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या समाजाविषयी सखोल माहिती संग्रहित करून ती प्रत्येक समाजबांधवांपर्यंत पोहचवण्यासाठी हे संकेतस्थळ नक्कीच महत्त्वाची भूमिका पार पाडीत आहे.

जिव्हेश्वर.कॉम विश्वकोशाचा विस्तार वाढविण्यासाठी आपल्या समाजातील विविध क्षेत्रातील जाणकार व तज्ज्ञ मंडळींच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे. ह्या विश्वकोशामध्ये विविध विषयांना अनुसरून विभाग तयार केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला एखाद्या विषयाची समाज-उपयुक्त माहिती मिळाल्यास तपशिलासह आम्हांस पाठवून द्या. तुम्ही पाठविलेली प्रत्येक माहिती हि विश्वकोशाच्या वृद्धी साठी महत्त्वाची आहे. तुम्ही ह्या महान कार्यात नक्कीच हातभार द्याल अशी आम्ही आशा करतो.

तुम्ही प्रामुख्याने खालील प्रमाणे माहिती पाठवू शकताः

  • दुर्मिळ माहिती, नवीनं माहिती, विविध विषयांच्या ज्ञानाची भर हे मुख्यतः कोणत्याही ज्ञानकोशाचे उद्दिष्ट असते. अर्थातच हे ज्ञान कोणी जाणकार, तज्ज्ञ व्यक्तींनी द्यावे लागते. आपणदेखील आपापल्या क्षेत्रातील ज्ञान ह्या विश्वकोशाच्या माध्यमाव्दारे सर्व लोकांपर्यंत पोहचवू शकता.
  • हा विश्वकोश संपूर्णं मराठीतच असल्याकारणाने आपण पाठविलेली माहिती ही शक्यतो मराठीतच असावी किंवा आपणाजवळ एखादी माहिती जर इतर भाषांमध्ये असल्यास तुम्ही ती माहिती मराठीमध्ये भाषांतरित करून आम्हाला पाठवू शकता.
  • आपण पाठवलेली समाजाची दुर्मिळ माहिती, साळी संस्कृती, साळी इतिहास, भगवान जिव्हेश्वरांच्या मंदिरांची माहिती व इतर माहिती हि तपशिलासह देणे आवश्यक आहे. नाहीतर ती माहिती प्रकाशनास ग्राह्य धरली जाणार नाही.
  • आपण पाठवलेली माहिती तज्ज्ञांकडून तपासून घेतली जाते आणि गरज असल्यास त्यातील काही व्याकरणातील चुका, शब्द रचनेतील चुका दुरुस्त करून प्रकाशन केले जाते.
Share