धोरणे व नियम

Share

जय  जिव्हेश्वर..!
नमस्कार वाचकहो,
जिव्हेश्वर.कॉम या साळी समाजाच्या विश्वकोशाचा दिवसेंदिवस विस्तार व माहितीचा संग्रह वाढत आहे. त्यामुळे संकेतस्थळावर येणार्‍या नविन वाचकांसाठी आणि सदस्यांसाठी जिव्हेश्वर.कॉमची कार्यपध्दती, वापरासंबंधीचे धोरणे व नियम माहिती असणे आवश्यक आहे. यापुढे जिव्हेश्वर.कॉमवर वावर करतांना आणि लेखन करतांना सदस्यांना ही धोरणे मान्य आहेत असं गृहीत धरले जाईल.


जिव्हेश्वर.कॉमची धोरणे व नियम:

१) जिव्हेश्वर.कॉम हे संकेतस्थळ खाजगी मालकीचे आहे. त्यामुळे ह्याचे मालकी हक्क बदलणे, ते चालवण्यास देणे, भागिदारी करणे, त्याचे आर्थिक व्यवहार करणे ह्या बाबतचे सर्वाधिकार मालकाकडेच राहतील.

२) जिव्हेश्वर.कॉम हा साळी समाजाचा विश्वकोश कोणत्याही संस्थेचे, मंडळाचे, संघटनेचे, पक्षाचे मुखपत्र म्हणून काम करत नाही. हा विश्वकोश संपुर्ण समाजाचा आहे त्यामुळे समाजविषयक माहीती जतन करुन जास्तीत जास्त समाजबांधवांपर्यत पोहचवणे हेच जिव्हेश्वर.कॉम टीमचे मुख्य कार्य आहे.

३) जिव्हेश्वर.कॉम वरील लेखांच्या प्रकाशनाच्या धोरणात परिस्थितीनुसार बदल करण्याचे हक्क जि.कॉम टीम कडे राखीव आहेत. त्याचा वेळोवेळी वापर करता येईल. गरज भासल्यास सदस्यांना जाहीर निवेदनामार्फत किंवा ई-मेलने तशी सूचना दिली जाईल.

४) जिव्हेश्वर.कॉम वरील कोणत्याही प्रकाशनाबाबत व्यवस्थापकाशी (admin[at]jivheshwar[dot].com) किंवा जिव्हेश्वर.कॉम टीमशी (jivheshwar2010[at]gmail[dot]com) येथे दिलेल्या ई-मेलने संपर्क साधावा.

५) जिव्हेश्वर.कॉम वरील कोणत्याही लेखामध्ये मराठी शुध्दलेखनाच्या चुका, चुकीचा शब्द, चुकीची वाक्यरचना आढळल्यास त्वरीत जि.कॉम टीम ला ई-मेल (jivheshwar2010[at]gmail[dot]com) करावा. ई-मेल मध्ये लेखाचे नाव तसेच लेखनात असलेली चुक आणि बरोबर काय हवे ते पाठवुन द्यावे.

६) सदस्यत्व नोंदणी करताना सदस्याने जिव्हेश्वर.कॉमला दिलेली माहीती सत्य आहे ह्याची संपुर्ण कायदेशीर जबाबदारी त्या सदस्याची राहील, सदस्याचे किमान वय १८ वर्षे पुर्ण असणे अनिवार्य राहिल. संकेतस्थळाने सदस्यत्व देताना अथवा त्यानंतर वेळोवेळी मागवलेली माहीती पुरवणे सदस्यास बंधनकारक राहिल.

७) जिव्हेश्वर.कॉमच्या सर्व सदस्यांसाठी सर्व स्थानिक कायदे बंधनकारक असतील. सदस्यानी दिलेली माहिती पोलिसांनी कुठल्याही तपासाकरीता  मागीतल्यास ती माहीती पुरवण्यास हे संकेतस्थळ बांधील आहे.

८) या संकेतस्थळाचा वापर सदस्यांनी त्याच्या स्वतःच्या जबाबदारीवर करावयाचा असून कोणत्याही प्रकारच्या नुकसानाला / तोट्याला / अडचणीला जिव्हेश्वर.कॉम जबाबदार असणार नाही.

९) काही तांत्रिक कारणास्तव या संकेतस्थळावरील साहित्य नष्ट झाल्यास, गहाळ झाल्यास, गायब झाल्यास अथवा त्याचे विकृतीकरण झाल्यास  त्याला जिव्हेश्वर.कॉम जबाबदार राहणार नाही, तसेच संकेतस्थळावरील ताण नियंत्रित करण्यासाठी सर्व अधिकार जिव्हेश्वर.कॉमकडे राहतील, शक्यतो असा कोणताही निर्णय घेण्यापुर्वी सदस्यांना ई-मेलने सुचना देण्याचा प्रयत्न केला जाईल.

१०) जिव्हेश्वर.कॉम च्या नावाचे / लोगोचे / बोधचिन्हे व सुविधा ह्यांचे सर्वाधिकार संकेतस्थळाच्या मालकाकडे राहतील व त्यांचा गैर वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे सर्वाधिकार जिव्हेश्वर.कॉमकडे राहतील.

११) जिव्हेश्वर.कॉम च्या नोंदणीकृत सदस्याला स्वतःचे साहित्य प्रकाशीत करणे, अन्य सदस्याशी संपर्क साधणे व योग्य त्या सोई अथवा माहीती देणे यासाठी जिव्हेश्वर.कॉम नक्कीच कार्यरत राहील.

१२) जिव्हेश्वर.कॉमवर मराठी टंकलेखनासाठी सदस्यांना / वाचककांना "लेखन साहाय्य" येथे मदत मिळू शकेल.

१३) वरील सर्व धोरणे व नियम कोणत्याही परिस्थितीत व केव्हाही व कोणत्याही प्रकारे बदलण्याचे हक्क जिव्हेश्वर.कॉमच्या व्यवस्थापकाचे किंवा जि.कॉम टीमचे राहतील.

धन्यवाद...!

आपला विनम्र,
व्यवस्थापक
जिव्हेश्वर.कॉम - साळी समाजाचा जगातील पहिला डिजिटल विश्वकोश...!

Share