निवेदन

Share

जिव्हेश्वर.कॉम हा विश्वकोश अधिक माहितीचा व समाज-उपयुक्त बनविण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग अतिमहत्त्वाचा आहे. आपल्या समाजातील बहुतांशी माहिती विखुरलेली आहे आणि काही दुर्मिळ माहिती व त्यांचे तपशील नष्ट झालेले आहेत. त्यामुळेच समाजातील प्रत्येक माहिती जतन करुन ठेवण्याचा जिव्हेश्वर.कॉम टीमचा प्रयत्न आहे.

आपण खालीलप्रमाणे विविध विषयांना अनुसरुन माहिती आम्हाला पाठवू शकता ती आम्ही तुमच्या नावासहित तसेच तपशिलासह प्रसिद्ध करू याची आम्ही तुम्हाला खात्री देतो.

  • आतापर्यंत आपल्या समाजातील तज्ज्ञ मंडळींनी भगवान जिव्हेश्वरांच्या विविध चरित्रांचे प्रकाशन केलेले आहे. त्यातील सर्वात जुनी प्रत कोणाकडे असल्यास आम्हाला ती समाजाच्या विश्वकोशामध्ये जतन करण्यासाठी पाठवा. तसेच किती वेगवेगळ्या चरित्रांचे प्रकाशन झालेले आहे, कोणी केले, कधी केले यांचाही तपशील मिळाल्यास आम्हाला पाठवून द्या.
  • संपूर्ण जगात विशेषतः भारतामध्ये भगवान जिव्हेश्वरांची कोठेकोठे मंदिरे आहेत यांची माहिती, मंदिराचा फोटो, संपूर्णं पत्ता, कार्यकारी सदस्य, फोन नंबर पाठवा. तसेच मंदिराची थोडक्यात माहिती पाठवावी.
  • समाजबांधवांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी स्थापन केलेली ज्ञातीगृहे/धर्मशाळा यांचा फोटो, संपूर्णं पत्ता, कार्यकारी सदस्यांची माहिती, फोन नंबर व ज्ञातीगृहे/धर्मशाळांची थोडक्यात माहिती पाठवा.
  • समाजात विविध ठिकाणी समाजबांधवांनी स्थापन केलेली कार्यालये, मंडळे यांची विस्तारीत माहिती संपूर्णं पत्त्यासह पाठवावी.
  • समाजात राबविलेले निरनिराळे उपक्रम यांचीही संपूर्णं माहिती पाठवावी.

Share