सदस्यांसाठी नियम व अटी

Share
 • जिव्हेश्वर.कॉम च्या सुविधांचा वापर करण्याचे अधिकार त्याच्या नोंदणीकृत सदस्यांनाच असतील. सदस्याची नोंदणी करताना सदस्याला जिव्हेश्वर.कॉमचे सर्व नियम व अटी मान्य आहे असे गृहीत धरले जाईल. ह्या नियमांचे पालन करणे हेही ती अस्तित्वात येण्यापुर्वी नोंदणीकृत झालेल्या सभासदांना बंधनकारक राहिल.
 • सदस्याची नोंदणी करताना सदस्याने जिव्हेश्वर.कॉमला दिलेली माहीती सत्य आहे ह्याची संपुर्ण कायदेशीर जबाबदारी त्या सदस्याची राहील, सदस्याचे किमान वय १८ वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे. या संकेतस्थळाने सदस्यत्व देताना अथवा त्यानंतर वेळोवेळी मागवलेली माहीती पुरवणे सदस्यास बंधनकारक राहिल.
 • नोंदणी झालेल्या सदस्याचे खाते रद्द अथवा स्थगित करण्याचे अधिकार जिव्हेश्वर.कॉमकडे राहतील. सदस्यत्व खालील परिस्थीती मध्ये स्थगित अथवा रद्द होऊ शकते.
  • सदस्यत्व घेताना दिलेली कोणतीही माहीती खोटी अथवा चुकीची आहे हे दिसून आल्यास.
  • सदस्यावर कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास.
  • सदस्याने अन्य सदस्य / वाचक अथवा अन्य कोणीही सन्मानीय व्यक्ती, मंडळ, संस्था, जाती, धर्म, विविध धर्मातील देव देवता, भारताची राज्य घटना, राष्ट्रगीत, राष्ट्राची मान चिन्हे, राष्ट्र ध्वज, राष्ट्र पुरुष, श्रध्दा व जिव्हेश्वर.कॉम ह्याबाबत अवमानकारक अथवा द्वेषमुलक किंवा भावना भडकवणारे लिखाण केल्यास अथवा अश्या प्रकारचे कोणतेही कृत्य केल्यास अथवा अश्या कृत्यांना प्रोत्साहन दिल्यास.
 • सदस्याने सादर / प्रकाशीत केलेल्या साहित्याच्या सत्यतेची संपुर्ण जबाबदारी सदस्याची असेल व ह्याबाबत जिव्हेश्वर.कॉम जबाबदार नसेल.
 • सदस्यांचे साहित्य संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्यानंतर सर्व मुद्रणाधिकार / प्रतीअधिकार/ पुर्नमुद्रण अधिकार आदी सर्व अधिकार त्या सदस्याकडेच राहतील.
 • संकेतस्थळावर प्रसिध्द अथवा प्रकाशीत केलेल्या साहित्यामुळे होणार्‍या कायदेशीर परिणामाची जबाबदरी संबधीत सदस्याची असेल. ह्या बाबत संकेतस्थळाची कुठल्याही प्रकारे जबाबदारी नसेल.
 • एखाद्या सदस्याचे सदस्यत्व जर रद्द अथवा स्थगित झाले तर त्याने प्रकाशीत केलेले साहित्य संकेतस्थळावर तसेच राहील. व सदस्यांने केलेल्या सुचनांचा विचार केला जाईल.
 • जिव्हेश्वर.कॉमच्या सर्व सदस्यांसाठी सर्व स्थानिक कायदे बंधनकारक असतील. सदस्यानी दिलेली माहिती पोलिसांनी कुठल्याही तपासाकरीता मागीतल्यास ती माहीती पुरवण्यास हे संकेतस्थळ बांधील आहे.
 • सदस्यांचे वरील सर्व अधिकार लक्ष्यात घेऊन सुध्दा कोणतेही आक्षेपार्ह साहित्य कोणत्याही आणी संबधीत सदस्याला न विचारता अप्रकाशीत करण्याचे अधिकार जिव्हेश्वर.कॉमकडे राहतील व ह्या बाबतची कार्य पध्दती निश्चित करण्याचे व तिच्यामध्ये वेळोवेळी बदल करण्याचे सर्व अधिकार जिव्हेश्वर.कॉमकडे असतील.
 • वरील सर्व नियम व अटी कोणत्याही परिस्थितीत व केव्हाही व कोणत्याही प्रकारे बदलण्याचे हक्क जिव्हेश्वर.कॉमच्या व्यवस्थापकाचे किंवा जि.कॉम टीमचे राहतील.

आपला विनम्र,
व्यवस्थापक

जिव्हेश्वर.कॉम - साळी समाजाचा जगातील पहिला डिजिटल विश्वकोश...!
Share