आमच्याविषयी

Share

जय जिव्हेश्वर...!

श्री. भगवान जिव्हेश्वर महाराजांच्या जयंती निमित्त कामास सुरू झालेल्या जिव्हेश्वर.कॉम डिजीटल विश्वकोशाच्या भव्य प्रांगणात आम्ही तुमचे सहर्ष स्वागत करतो.

वाचकहो, एक दिवस सहज गप्पा मारत असताना आपल्या समाजाचा विषय निघाला आणि उगाचच एक प्रश्न मनात येऊन गेला. की आपण समाजासाठी काय करतो आणि काय करू शकतो? तेव्हा वाटले समाजात एवढी मासिके, समाचार पत्रके, त्रैमासिके आहेत ती किती लोक वाचत असतील आणि किती रद्दीत जात असतील याचा काही नेम नाही. आणि जर आपल्याला काही वर्षापूर्वी एखाद्या महिन्यात प्रसिद्ध झालेली ठराविक माहिती कुठे व किती वेळात मिळू शकेल हे सांगणे थोडे कठिणच जाईल हो ना? या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजेच जिव्हेश्वर.कॉम डिजीटल विश्वकोशाची निर्मिती...!

तेव्हा वाटले की आपल्या समाजाचे असे एक संकेतस्थळ तयार करावे की तिथे सर्व समाज उपयुक्त माहिती मिळू शकेल पण पुन्हा एक प्रश्न उभा राहिला की सर्वाच्या घरी इंटरनेट सुविधा उपलब्ध असेल काय? मान्य आहे, नसेलही परंतु आपण जर एक विचार केला की दहा ते पंधरा वर्षापूर्वी सर्वांच्या घरी टीव्ही सुद्धा नव्हते, आणि आता पाहा सर्वांच्या घरी टीव्ही तर आहेतच पण त्यासोबत कॉम्प्युटर सुद्धा आहे. त्यामुळेच आम्हाला अशी खात्री वाटते की आता जरी सर्वांच्याकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध नसेल तरी पुढील काही वर्षात ती नक्कीच घराघ्ररात पोहोचलेली असेल. त्यामुळे जिव्हेश्वर.कॉम डिजीटल विश्वकोश हा नक्कीच उपयुक्त ठरेल याची आम्हाला खात्री वाटते.

जिव्हेश्वर.कॉम विश्वकोशामध्ये तुम्हाला अथपासुन इतिपर्यंत सर्व माहितीचा खजिना उपलब्ध होईल. म्हणजेच समाजदर्शन, समाजाचा इतिहास, संस्कृती, मंदिरे, ग्रंथसंपदा, कार्यालये, ज्ञातिगृहे, महिला-वृत्तांत, सामाजिक उपक्रम, कथा, कविता, चरित्र, प्रवासवर्णने, आत्मनिवेदन, आठवणी, वैचारिक लेख, स्मरणीय व्यक्ती इ. माहिती असेल. म्हणूनच आम्ही याला समाजाचा विश्वकोश म्हणतो.

हि सर्व माहिती एकाच वेळी देणे शक्य नाही. यासाठी एकेका शब्दांनी ही माहिती एकत्र करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आणि असलेली माहिती घराघरात काही क्षणात पोहचविणे हे आमचे ध्येय आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, शब्दांनी हा विश्वकोश बांधला जाणार आहे. तुम्हाला जमेल तसे, मिळेल ती समाजोपयुक्त माहिती आमच्यापर्यंत पोहचविणे हे तुमचे योगदान येणा-या पिढीसाठी नक्कीच महान कार्य ठरेल. तरी सर्वांनी जिव्हेश्वर.कॉम डिजीटल विश्वकोशामध्ये शब्दांची गुंफणं करावी हिच एक नम्र विनंती...!

-जिव्हेश्वर.कॉम टिम

Share