आमचे उद्दिष्ट

Share
  • आमचे उद्दिष्ट आहे की समाजातील प्रत्येक स्तरावरील माहिती गोळा करणे, अचूक टायपिंग करणे आणि कमीत कमी वेळात तुम्हाला उपलब्ध करून देणे.
  • साळी समाजाचे आराद्य दैवत भगवान श्री. जिव्हेश्वरांची माहिती, साळी संस्कृती, इतिहास, संशोधन, मंदिरे, कार्यालये, ज्ञातीगृहे, समाज वृत्तांत, उपक्रम, विशेष कर्तबगार व्यक्तींचा परिचय, महिला वृत्तांत, स्मरणीय व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, इ. माहिती इंटरनेटवर उपलब्ध करणे की जेणेकरून समाजातील जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ होईल.
  • भारतातील सर्व साळी समाजातील उपवधू-वर विषयक माहिती विनामूल्य देणे व त्यासाठी आवश्यक गुणमिलन, रेशीमगाठी, ज्योतिष विषयक लेख उपलब्ध करणे.
  • समाजाचे आगामी कार्यक्रम, उपक्रम, चालू घडामोडी, वधूवर मेळावे यांची माहिती ई-मेल व्दारे सर्व सदस्यांना पाठविणे.
  • समस्त साळी जनांचे आराद्य दैवत भ.श्री.जिव्हेश्वर यांची पोथी तसेच इतर दुर्मिळ ग्रंथ यांचे डिजीटल स्वरूपात रुपांतर करून ई-आवृत्ती डाउनलोड करण्यास देणे.
  • समाजातील कलाप्रेमी व नव साहित्यिकांच्या कला गुणांना वाव देणे व त्यांचे साहित्य प्रकाशित करणे.
Share