स्वकुळ धारा - भाग ४
।। भ जिव्हेश्वर विवाहसोहळा ।।
भ जिव्हेश्वर आणि माता आकिंनीदेवी व दशांकीनीदेवी यांच्या विवाहसोहळ्याची सुंदर व मनमोहन कथा " श्री जिव्हेश्वर साळी महात्म पुराण " आध्याय १० वा अोव्या ६५ ते १५९ मध्ये विद्यमान आहे.पण दुर्दैवाने ती दुर्लक्षीत झाल्याने साळीमाता व जिव्हेश्वरांच्या १० पुञांची माहिती कमी प्रमाणात प्रसिद्ध झाली .
ब्रम्हदेवा॑च्या कन्या आकिंनीदेवी व दशांकीनीदेवी यांचा विवाहासोहळा श्रीजिव्हेश्वर यांच्या बरोबर ब्रम्हलोकात माघ शुद्ध द्वादशी या शुभ मुहूर्ता वर श्रीजिव्हेश्वरांचे मामा श्री महाविष्णु यांनी ठरवला म्हणून आपल्यात लग्न ठरविण्याचा मान मामाला दिला जातो .
ब्रम्हलोकात आनेक देवांनी भव्य आशा स्वरूपात लग्नमंडप आणि समारंभाचे आयोजन केले ब्रम्हदेवा॑नी सर्व व-हाडाचे ब्रम्हलोकाच्या सिमेवर स्वगत करुन सिमंतपुजन केले
श्रीजिव्हेश्वरांचा व्रतबंध ( मुजं ) करुन हळद लावली ( म्हणून आपल्याला मुजींचा व सिमंत पुजनाचा आधिकार आहे )
नारदमुनीनी लग्नात मंगलाष्टका व सर्व पौरहित्य केले.
आन्नपुर्णेने सुग्रस जेवणावळींची सिध्दता केली व ब्रम्हदेवा॑नी कन्यादान करताना श्रीजिव्हेश्वरांना वेद आदंण दिले तेव्हापासून स्वकुळ साळी समाजाला वेदआध्यायनाचा आधिकार प्राप्त झाला.
भ शंकर व माता पार्वतीने सर्वानां आहेर करून सन्मान केला त्या नंतर आपल्या दोन्ही सुना आकिंनीदेवी आणि दशांकीनीदेवी यांना घेउन कैलासावर प्रयाण केले.
आशा रितीने श्रीजिव्हेश्वर ब्रम्ह कुळाचे जावई झाले.
।। हर हर जिव्हेश्वर ।।
. . . . . . . . . . . ( क्रमश )
संकलन
श्री. अमोल कविटकर, पुणे