स्वकुळ धारा - भाग ८
भ जिव्हेश्वर पुञांचे आलोकीक कतृत्व
साळीमाता दशांकीनीदेवी यांच्या सहा पुञांची किर्ती देवलोका॑त पसरली त्या मुळात त्यांना देवांनी भ शंकरांच्या कडुन मागुन घेतले .
१ कैलासभुवन यांना श्री इंद्रदेवानीं स्वर्गात नेले.
२ सनातन यांना महाविष्णु वैकु॑ठात घेउन गेले.
३ भक्तिमान यांची कार्य करण्याची पद्धत पाहून यमदेवांनी त्यांना घेऊन जाण्याची विनंती भ शंकराना करून त्यांना यमलोकी नेले.
४ पर्वकाळ या आपल्या नातवास ( साळीमाता दशांकीनीदेवी ब्रम्हदेवाच्या कन्या आहेत ) घेउन जाण्याचा मोह प्रजापीता ब्रम्हदेवानां आवरला नाही.
५ दयासागर आणि ६ आर्चन यांना आजी पार्वतीनीं कैलासावर ठेवण्याचा हट्ट भ शंकरांच्या कडे धरला म्हणून हे दोघे जण कैलासावर साळीमाता दशांकीनीदेवी यांच्या कडे रहिले.
( संदर्भ --- आध्याय १२ अोव्या ८७ ते ९४ )
॥ हर हर जिव्हेश्वर ॥
. . . . . . . . ( क्रमशः )
संकलन
श्री. अमोल कविटकर, पुणे