अनोखी गाडी शेतात, वाळवंटातही चालवा
आपल्या समाजातल्या प्रा.सुनिल चाफळकर यांच्या मार्गदर्शनामुळे एका अनोख्या गाडीची निर्मिती झाली. त्यांचे जिव्हेश्वर.कॉम टीम व सर्व समाजबांधवांकडून हार्दिक अभिनंदन!
पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्याची नावीण्यपूर्ण निर्मिती
साधारपणे मोटारी रस्त्यावरुन धावतात. मात्र, रस्त्यासह शेतात, वाळवंटात, समुद्रकिनारी अशा कोणत्याही ठिकाणी चालू शकणारी अनोखी गाडी बनवली आहे. निगडी प्राधिकरणातील विद्यार्थ्यानी. पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच अशा प्रकारची गाडी बनविण्यात आल्याचा या विद्यार्थ्याचा दावा आहे.
पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मेकॅनिकल डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात शिकणार्या उमेश शेगोकार, गणेश सांडभोर, महेश वाघेरे, प्रशांत झरेकर या विद्यार्थ्यानी अवघ्या तीन महिन्यांत ही गाडी बनविली आहे. त्यांना प्रा.सुनिल चाफळकर व अशिष शेळके यांचे मार्गदर्शन मिळाले.
उमेश शेगोकार याच्या मनात अशा प्रकारची गाडी बनविन्याची कल्पना आली. डिप्लोमाच्या द्वितीय वर्षाला असतानाच त्याने गाडी बनविण्याचे ठरविले होते. या अनोख्या गाडीत भंगारमालाचा (स्कॅप मटेरियल) जास्त वापर केला आहे. बॅटरी व मोटारीवर ही गाडी चालते. अंदाजे दिड लाख रुपयांत विद्यार्थ्यानी ही गाडी तयार केली आहे. बाजारात अशा प्रकारच्या गाड्यांची किंमत ४ ते ६ लाख रुपये आहे.