आमरण उपोषण २१-मार्च-२०११

Share

विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समिती, महाराष्ट्र

व्दारा - 'जिव्हाजी सांस्कृतिक भवन' १९/१००, ए.एस.सी. कॉलेजशेजारी, इचलकरंजी - ४१६११५ जि. कोल्हापूर (महाराष्ट्र)
 

आमरण उपोषणाची नोटीस


आदरणीय नामदार श्री.पृथ्वीराज चव्हाण साहेब,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई.

मार्फत : मा.

विषय: विशेष मागास प्रवर्गाच्या (एसबीसी) विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी दि.२१-मार्च-२०११ पासून पुणे येथे संचालक समाजकल्याण विभाग पुणे यांचे कार्यालयासमोर "आमरण उपोषण" करणेबाबत.

संदर्भ: सुरेश पद्मशाली, अध्यक्ष महाराष्ट्र पद्म्शाली अ.नि.कृ.समिती यांनी मुंबई येथे आझाद मैदानात दि.१७-जुलै-२००० व २६-मार्च-२००७ पासून केलेले आमरण उपोषण व २१-एप्रिल-२००८, २८-जुलै-२००८, २५-फेब्रुवारी-२००९, १-जुलै-२००९ व २६-मे-२०१० रोजी समाज बांधवांनी केलेले आंदोलन.

महोदय,
१९९४ मध्ये इतर मागास प्रवर्गास समाविष्ट असलेल्या जातीपैकी स्वकूल साळी, साळी, पदमशाली, देवांग कोष्टी वगैरे समाजासह ४१ जाती व उपजातींच्या शैक्षणिक, आर्थिक व समाजिक उन्न्तीसाठी विशेष मागास प्रवर्गाची निर्मिती करण्यात आली व २ टक्के स्वतंत्र आरक्षण लागू करण्यात आले व १२ सवलती जाहीर करण्यात आल्या.

परंतु १६ वर्षानंतरही या योजना व सवलतींची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आपल्या न्याय हक्कांसाठी २००० पासून आम्ही दरवर्षी शांततामय मार्गाने उपोषण व धरणे आंदोलन करुन शासनासोबत चर्चा करीत आहोत. शासनातर्फे दरवर्षी आम्हांस आश्वासने दिली जातात परंतु मागण्यांची अंमलबजावणी होत नाही.

म्हणून नाईलाजास्तव यावर्षी २१-मार्च-२०११ पासून खालील मागण्यांसाठी 'आमरण उपोषण' करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

मागण्या:
१. वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रवर्गासाठी २% स्वतंत्र आरक्षण २०११ सत्रापासून लागू करावे.
२. विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यात १० आश्रमशाळा सुरु कराव्यात.
३. बि.एड. व डी.एड. अभ्यासक्रमात प्रवेश घेणार्‍या विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्काची १००% प्रतिपुर्ती करण्यास मान्यता द्यावी.
४. विशेष मागास प्रवर्गास २% राजकीय आरक्षण द्यावे.
५. विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनांच्या योजनांसाठी एस.बी.सी. व केंद्र शासनाच्या योजनांसाठी व केंद्र शासनाच्या योजनांसाठी ओबीसी प्रमाणपत्र द्यावे.

वरील मागण्या मान्य कराव्यात ही विनंती.

आपले विश्वासु,
सुरेश पद्मशाली (सरचिटणीस, वि.मा.प्र.अ.नि.कृ.समिती)
सुभाष बेलेकर (कार्याध्यक्ष, वि.मा.प्र.अ.नि.कृ.समिती)
आ.कैलाश गोरंटल (अध्यक्ष, वि.मा.प्र.अ.नि.कृ.समिती)
सोमनाथ कासटकर (सरचिटणीस, म.प्रा.स्व.सा.स.)
बाळासाहेब कांबळे (अध्यक्ष, म.प्रा.स्व.सा.स.)
जनार्दन दळवी (उपाध्यक्ष, म.प्रा.स्व.सा.स.)
दत्तात्रय कनो़जे (अध्यक्ष, स्व.साळी समाज)
चंद्रकांत बडवे (अध्यक्ष, को.जि.स्व.सा.समाज)
दिलीप घट्टे (कोषाध्यक्ष, अ.भा.स्व.साळी समाज)
सौ.संजली बावणे (महिलाध्याक्ष, अ.भा.स्व.सा.समाज)
रामदास काजवे (माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा स्व.सा.समाज)

Share
अमावस्या अशुभ दिवस आहे काय?
Thursday, 20 June 2013
एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...
गुरुबल कशासाठी बघतात?
Thursday, 20 June 2013
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...
ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
Thursday, 20 June 2013
दशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...
ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?
Thursday, 20 June 2013
ग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...
ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
Thursday, 20 June 2013
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...
खुळ्या वयातली साथसंगत
Thursday, 20 June 2013
जगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...
चि.सौ.सुनबाई,
Thursday, 20 June 2013
हे बघ, "मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन"... "जशी माझी लेक तशी... Read More...
तयारी पहिल्यावहिल्या भेटीची!
Thursday, 20 June 2013
एखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...
परफेक्‍ट पार्टनर'च्या शोधात...
Thursday, 20 June 2013
जोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...
बोहोल्यावर चढण्यापूर्वी..
Thursday, 20 June 2013
ठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...