जागतिकीकरण आणि साळी समाज
आजच्या आधुनिक व जागतिक करणाच्या युगातही मानवाच्या "अन्न , वस्त्र व निवारा" या प्रमुख गरजा आहेत. अन्नाची गरज ही नैसर्गिकरीत्या भागविली जाते. पण वस्त्र व निवारा या तीनही गरजा मानव वेगवेगळ्या प्रकारे भागवितं असतो. सध्याचे युग हे दिखावाचे, सजावटीचे आहे. त्यामुळे 'एक नूर आदमी दस नूर कपडा' या म्हणी प्रमाणे "जगातील, प्रत्येक मानव आपण सुंदर दिसावे यासाठी वस्त्रांचाच आधार घेत असल्याचे दिसते. स्त्री वर्गाच्या बाबतीत तर वस्त्रांची महती अवर्णनीय अशी आहे. असा हा वस्त्र महिना आहे तर हा वस्त्र निर्माता कोण असावा ? हा प्रश्न कित्येकांना असावा.
आपण भारतीय प्रत्येक बाबतीत रामायण, महाभारत व पुराणकालीन कथा यांवर विश्वास श्रद्धा ठेवून वागत आलो आहोत. याच देव कालीनं पुराणात आदिमायेच्या आदेशाने शंकराने श्री जिव्हेश्वरांना जिव्हेद्वारे जन्म दिल्याचे सांगितले आहे. कारण पृथ्वीवरील मानवास वस्त्राविना जगतांना अनेक समस्या उभ्या राहत होत्या. व वस्त्राविना मानव म्हणजे इतर प्राणी व मानवात काहीच फरक नव्हता आजही मानवा शिवाय या पृथ्वीवरील कोणताही प्राणी कपडे वापरीत नाही. हा सर्वात मोठा फरक आहे.
जगातील पहिला वस्त्र निर्माता म्हणून श्री जिव्हेश्वरांना मानले जाते त्यांनी वस्त्र निर्माणासाठी सर्व देव देवतांची मदत घेऊन एक यंत्र तयार केले त्यास "हात माग" असे म्हणतात. हात मागाच्या साहाय्याने वस्त्र निर्माण होऊ लागले व ही परंपरा "साळी" स मा जा ने आजही सांभाळली आहे.
भारतातील सर्व साळी समाजाचा वस्त्रविणनेहापारंपरिकउद्योगआहे.कालांतरानेहातमागच्याजागी यंत्रमाग आलेत, आता संगणकावर वस्त्रांचेडिझाईनतयार केलेजाते यातही साळी समाज आघाडीवर आहे पूर्वीखांदेशातहाव्यवसायमोठ्याप्रमाणात केला जात होता आता भिवंडी, सुरत, अ. बाद, बंगलोर, इचलकरंजी, कोल्हापूर या दमटहवामानाच्या प्रदेशात हा व्यवसाय एकवटलाआहे.
सर्वाना वस्त्र पुरवीत लज्जा रक्षणाचे महत्त्वाचे काम करणारा समाज स्वातंत्र्यानंतर मात्र देशोघडीला लागला आहे. हातमागाची जागा यंत्र मागाने घेतल्याने या व्यवसायातील कला लोप पावली. पूर्वी एका हातमागावर कापड विणण्यासाठी लागणारे विविध कामे उदा. ठमणी, डबे, कांड्या भरणे, कांजणी काणे, विणणे ही सर्व कामे कुटुंबातील मुले व महिला सर्व मिळून करीत असल्याने स र्वानाच विनासायास उद्योग प्राप्त होत असे, पण याच कारणामुळे समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी झाले. कुटुंबप्रमुख व्यक्ती घरातच रोज गार निर्माण होत असल्याने मुलांना शिक्षण देऊन बाहेर नोकरी व्यवसायासाठी पाठवीत नसे. यामुळे हळूहळू उद्योग बंद पडून समाजात बेरोजगारी निर्माण झाली. त्यात शिक्षण कमी किंवा नाही म्हणजेच "दुष्काळात तेरावा महिना" साळी समाजात शिक्षणाचे प्रमाण पाहिल्यास स्वातंत्र्यांपूर्वीच्या किंबहुना १०० वर्षापूर्वी निरक्षरता ५० वर्षापूर्वी शिक्षित व आत उच्च शिक्षण असा जरी समाजाचा शिक्षण प्रवास दिसत असला तरी, उच्च शिक्षण घेणार्याचे प्रमाण इतर समाजाचा मानाने फारच कमी आहे.
केंद्र सरकारच्या धोरणानुसार ओ. बी. सी. या वर्गात समाजाचा समावेश होता पण १९९६ मध्ये गोवारी आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाने विशेष मागास प्रवर्गात समाजास समाविष्ट केले. परंतु फक्त महाराष्ट्रातच हे आरक्षण आहे. इतर राज्यात हे आरक्षण घटनेच्या तरतुदीनुसार नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. उदा. महाराष्ट्रात एखाद्या कुटुंबातील १ भाऊ गुजरात मध्ये वास्तवास गेला असल्यास एक भाऊ एस. बी. सी. व दुसरा ओ. बी. सी. असा प्रकार होत आहे. यासाठी समाजाच्या धुरीणांनी पुन्हा एकदा प्रयत्न करून अखिल भारतीय स्तरावर एकच प्रवर्गात समावेश होण्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे. वास्तविक साळी समाजाला संघर्षाची अजिबात पार्श्वभूमी नाही. शांततेने व सलोखाने जीवन जगणारा हा समाज आहे. त्यात एस. बी. सी. चे २% आरक्षण अत्यंत अल्प आहे. या प्रवर्गात अनेक जाती असल्याने गुणवत्ता व इतर निकषांच्या बाबतीत आम्ही कमी पडतो व मागे राहतो.
महत्त्वाचा प्रश्न आहे तो व्यवसायाचा भारतीय व्यवस्थेप्रमाणे प्रत्येक समाजाला व्यवसाय निश्चित आहे काळागणीत त्यातबदल जरी होत असला तरी मूळ व्यवसाय कायम आहे. मात्र साळी समाजाचा विचार केल्यास आमच्या "विणकाम" हा व्यवसाय काळाच्या ओघात नष्ट झाला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही , इतर नोकरी व्यवसायातील कौशल्ये आत्मसात करण्यासाठी तेवढा वेळ मिळत नाही व बाजारातील परिस्थिती तीव्र स्पर्धेची असल्याचे स्पर्धेत यश मिळत नाही. म्हणजे केंद्र व राज्य शासनाचा धोरणात साळी समाज "आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना" अशा स्थितीत येऊन ठेपला आहे.
आजची खरी गरज आहे ती अखिल भारतीय स्तरावर एकच धोरण आखण्यांची, सर्वांना समान संधीची, आणि अत्यल्प असलेला व रोजगार नसलेला समाजात ठोस कार्यक्रम देण्याची. केंद्रशासनाचे वस्त्रोधोग महामंडळाच्या योजना खऱ्या अर्थाने सर्वा पर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. याकामासाठी समाजाकडे राजकीय वजन असावे लागते. दुर्दैवाने साळी समाजाला कोणत्याही पक्षाचे राजकीय नेतृत्व नाही. कारण मुळात समाज अत्यल्प असून ही एकी व संघटना नाही. समाजात अनेक गट-तट आहेत. त्यामुळे नेतृत्व उदयास येऊ शकले नाही. सुदैवाने गेल्या ५/१० वर्षापासून तरुणांच्या विधायक विचारांमुळे ठीक ठिकाणी संस्था, मंदिरे, मंगलकार्यालय इ. च्या उभारणीतूनसमाजसंघटनाची नवी पहाट उगवू पाहत आहे.भगवान श्री.जिव्हेश्वरत्यांच्याप्रयत्नांना यश देवो हीच आजच्या भगवानश्री.जिव्हेश्वरजयंती निमित्त प्रार्थना...!