मा. म.न.ढोकळे सर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

Share

कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळातर्फे एप्रिल महिन्यात आयोजित केलेल्या सत्कार समारंभात मा. म.न.ढोकळे सरांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.

डोंबिवली- कल्याण परिसरात गेली २१ वर्ष १० वी व १२ वी च्या  विद्यार्थी व पालक यांच्यासाठी परीक्षा सराव व समुपदेशन केंद्र या माध्यमातून अभ्यासाबाबतचे समुपदेशन व परीक्षेच्या वातावरणात सराव परीक्षेचे आयोजन करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य श्री. म न ढोकळे सर करीत आहेत.

ढोकळे सरांचे मुळ गाव आपल्या सोलापूर जिल्हातील बार्शी तालुक्यातील "चारे" हे असून माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण बार्शी येथे झाले आहे. १९७२ च्या बी कॉम च्या वर्षात सरांनी उत्तर पत्रिकेचा सराव करूनच उज्वल यश संपादिले आहे. "आधी केले मग सांगितले" ह्या तत्वाने सर वागतात. सरांचा विद्यार्थी पालक संपर्क फार मोठा आहे.

ढोकळे सरांचा तत्वे पाठ करण्याबरोबरच ती आचरणात आणण्यावर भर असतो. म्हणूनच आनंदी राहा! उत्साही राहा!! हे तत्व सर आचरण्यात आणताना दिसून येतात. अभ्यासाबाबत "सराव" महत्वाचा असून नुसते वाचून वा पाठ करून अभ्यास होत नाही तर उत्तर पत्रिका परत परत लिहूनच अभ्यास होतो. हे अभ्यासाचे अत्यंत महत्वाचे सूत्र आहे. हे सरांनी स्वत:च्या अनुभवातून विद्यार्थी व पालकांना सांगितले आहे.

सरांना वाचनाची आवड असून "वाचनवेग" यावर व्याख्याने आयोजित केली आहेत. हस्ताक्षर सुधारणा यावर मा. नाना लाभे यांना गुरु स्थानी मानून सर हस्ताक्षर व वाचन वेगावर समुपदेशन व मार्गदर्शन करतात.

ढोकळे सरांनी सन २०११-१२ या शौक्षणिक वर्षांत १० च्या विद्यार्थांसाठी विषयावर तयारी कशी करावी यावर सकाळच्या करीयर वार्ता मधून लेख लिहिले आहेत. त्याचप्रमाणे सुट्टीत काय करावे याबाबतही लेख लिहिला आहे. सर वर्तमान पत्रातून तसेच मासिकामधून लेख लिहितात. महाराष्ट्र सरकारच्या "शेतकरी" मासिकातून सरांनी लिखाण केले आहे. सरांच्या कविता प्रसिध्द असून लवकरच म्हणजे मे महिन्यात त्यांचे "अभ्यास यशाच्या युक्त्या" हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.

Share
अमावस्या अशुभ दिवस आहे काय?
Thursday, 20 June 2013
एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...
गुरुबल कशासाठी बघतात?
Thursday, 20 June 2013
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...
ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
Thursday, 20 June 2013
दशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...
ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?
Thursday, 20 June 2013
ग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...
ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
Thursday, 20 June 2013
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...
खुळ्या वयातली साथसंगत
Thursday, 20 June 2013
जगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...
चि.सौ.सुनबाई,
Thursday, 20 June 2013
हे बघ, "मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन"... "जशी माझी लेक तशी... Read More...
तयारी पहिल्यावहिल्या भेटीची!
Thursday, 20 June 2013
एखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...
परफेक्‍ट पार्टनर'च्या शोधात...
Thursday, 20 June 2013
जोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...
बोहोल्यावर चढण्यापूर्वी..
Thursday, 20 June 2013
ठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...