बारामती मध्ये जिव्हेश्वर उत्सव उत्साहात साजरा

Share

स्वकुळ साळी समाज्याचे कुलदैवत श्री जिव्हेश्वर भगवान यांच्या जन्म उत्सवाचा कार्यक्रम दि. १०/८/२०१४ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री जिव्हेश्वर व्रत आणि  श्री जिव्हेश्वर हवन विधी ने श्री अभय  शेकटकर यांच्या येथे साजरा झाला  व श्री कमलेश जेधे यांनी पूजा विधी सांगितला. बारामती समाजाचे अध्यक्ष श्री अंकुश पेंढारकर यांनी आपल्या भाषणात  बारामती मधील समाजाच्या प्रत्येक घरात आपले कुलदैवत श्री जिव्हेश्वर भगवान  यांच्या मूर्ती देण्याचा संकल्प सांगितला त्यासाठी अर्थसाह्य साळी समाज बारामती आणि सौ सुनिता अभय शेकटकर यांनी देण्यचे ठरले. व श्री जिव्हेश्वर भगवान यांच्या  मंदिरासाठी जागेची व्यवस्था करून मंदीर बांधणे साठी प्रयत्न करण्याचे ठरले. कार्यक्रमात श्री महादार सर , श्री कांबळे सर श्री टपळे सर या वक्त्यानीं मनोगत व्यक्त केले तसेच श्री बिचकर, श्री नगरकर , श्री मानकर श्री उपरे , श्री सरोदे श्री खिंडारे श्री पेंढारकर, श्री भागवत ,श्री जेधे व भगिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .श्री पावले यांनी सूत्रसंचालन केले .