स्वा.सै.श्री.धारणकर अण्णा (साहेब) सोनू
जन्मगाव नाशिक. शिक्षण ५ व्या इयत्तेपर्यन्त. १९४२ मध्ये मिरवणूक काढून ब्रिटिश सरकार विरूद्ध प्रचार केल्यामुळे अटक झाली व २५ रुपये दंड झाला. १९४३ मध्ये आगाखान पॅलेस मोर्चात भाग घेतल्यामुळे ३ महिने शिक्षा झाली. आंदोलन काळात विध्वंसक कार्यात भाग घेतल्यामुळे १ १/२ महिना शिक्षा झाली. शासनाकडुन मानधन व सन्मानपत्र मिळाले.
टीप - वरील दिलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांविषयी अधिक माहिती/फोटो मिळाल्यास जिव्हेश्वर.कॉमला जरुर पाठवा.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे