माता अंकिनीदशाकिंनीसहित जिव्हेश्वर पुजा विधी

Share


 

साहित्य-
(१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का रांगोळी
(२) विडयाची पाने २५, सुपा-या-१५ नारळ ३, खारका ५, बदाम ५, हळकुंड ५,खोब-याची वाटी,
(३) पाट २,चौरंग १, तांबे २,ताम्हन १ देवाचे पाणी टाकण्यासाठी भांडे, समई,नीराजंन, पळी(छोटी मोठी) शंख घंटा जीव्हेश्वराचा फोटो किंवा मूर्ती
(४) तेल(समई साठी), गाईचे तुप, गोमुत्र कापुराची डबी,अत्तर,चौरंगावर वस्त्र,जानव्हेजोड,बाजारातील ओटी २
(५) अक्षदा--हळद, कुंकू ,गुलाल अष्टगंध,बुक्का व झेंडूच्या पाकळ्या घालून अर्धा पावशेर तांदूळ.
(६) फळे ५ ,गुळखोबरे ,नेवेद्य

मांडणी
१) प्रथम पूज्या विधीची जागा गोमुत्र टाकलेल्या पाण्याने पुसून घ्यवी व घरात गोमुत्र शिंपडावे.
२) चौरंग ठेऊन त्यावर वस्त्र टाकावे. अक्षदा ठेऊन त्यावर भ.जीव्हेश्वराचा फोटो ठेवावा.
३) चौरंगावर आपल्या डाव्या हाताच्या कोप-या वर अक्षदा ठेऊन त्यावर गणपतीची सुपारी ठेऊन समोर गुळखोबरे ठेवावे. तसेच फोटो समोर अक्षदावर दोन सुपा-या अंकिनी व दशनकिंनी या जिव्हेश्वरपत्नीच्यां नावे ठेऊन समोर दोन ओट्या ठेवाव्यात.व शंख आणि घंटा जवळ धुवून गंध लावुन  ठेवावी.
४) राहिलेल्या जागेत अक्षदा ठेऊन त्यावर जिव्हेश्वर पुत्राच्या १० सुपा-या ठेवाव्यात. व त्याला गंध लावावा.
५) चौरंगाच्या उजव्या बाजूला अक्षदावर कलश ठेऊन त्याला गंध लावावा.
६) चौरंगाच्या डाव्या बाजूला अक्षदावर समई ठेऊन गंध लावावा.
७) या सर्वा भोवती साधी रांगोळी काढून त्यावर हळद, कुंकू टाकावे.

संकल्प- हातात अक्षदा व पाणी घेऊन खालील मंत्र म्हणुन संकल्प सोडून ताम्हनात अक्षदा व पाणी सोडावे.

समाज ,गृह, परिवार शांती कृपा आशीर्वाद प्रित्यर्थ  भ. जिव्हेश्वर हवन विधी करिष्ये !

प्रथम गणपती पूजन करावे

प्रथम चौरंग किवा पाट मांडून त्यावर तांदळावरती सुपारी ठेवावी.
हातात तांदूळ घेऊन त्यावर खालील मंत्राने अवाहन करून अर्पण कराव्यात .

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ | निर्विन्घ कुरमेंदेओ सर्व कार्येषु सर्वदा ||

पळीने ताम्हनात दोनदा  पाणी सोडून प्रत्यक वेळी क्रमाने खालील मंत्र म्हणावे.

१) पाद्यं समर्पयामि     २) आचमनं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे )

सुपारी ताम्हनात घेऊन खालील मंत्र म्हणत पाण्याने धुवून परत तांदूळावर ठेवावी
स्नानमं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे )

खालील मंत्राने हळद , कुंकू , अष्टगंध अर्पण कराव्यात .
1) हरिद्रा समर्पयामि 2) कुंकुम समर्पयामि 3)अष्टगंध समर्पयामि

फुले दुर्वा अर्पण कराव्यात................... पुष्पं दुर्वाकुरमं समर्पयामि

या मंत्राने जानवे अर्पण करावे .....यज्ञपावित्मं समर्पयामि

पुढील  मंत्राने अत्तर अर्पण करावे-----सुगंधी परिमल द्रव्यम समर्पयामि

उदबत्ती व दिवा ओवाळावा....धूपंम दर्शयामि दिपमं दर्शयामि
                                                                                                                                 
 नैवेद्य समर्पयामि..(खालील मंत्र म्हणुन गुळ खोबर्याचा नैवेद्य दाखवावा )
प्राणाय स्वाहा,व्यानाय स्वाहा,उदानाय स्वाहा अपानय स्वाहा,समानाय स्वाहा
नमा ब्रम्हनेन ||

नैवेद्य दाखवुन झाल्यावर खालील मंत्र म्हणुन दोन पळ्या ताम्हनात पाणी सोडावे
१) हात प्रक्षालन........      २)  मुख प्रक्षालन .........
खालील मंत्र म्हणुन अक्षता टाकून नमस्कार करावा

सर्व उपचाराथे अक्षता समर्पयामि ........ नमस्करोमि

शंख घंटा कलश आणि दीप यावर फक्त गंध व पाकळ्या सहित अक्षताने पूजन  करून
जिव्हेश्वर पुजा विधी आरंभ करावी.


प्रथम तांदळावर फोटो किंवा मूर्ती ठेऊन हातात तांदूळ घेऊन त्यावर खालील मंत्राने
अवाहन करून अक्षता अर्पण कराव्यात .
ओम लज्जा रक्षणार्थमं | आद्यवस्त्र प्रयोजकमं | स्वकुल कूलनिर्मिकमं शिवपुत्र जिव्हेश्वराय | शरणमं प्रपद्ये ||

जिव्हेश्वर भगवान अवयामी पूजयामि
पळीने ताम्हनात दोनदा  पाणी सोडून प्रत्यक वेळी क्रमाने खालील मंत्र म्हणावे
१) पाद्यं समर्पयामि  २) आचमनं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे )

मूर्ती असेल तर ताम्हनात घेऊन खालील मंत्र म्हणत पाण्याने धुवून परत तांदूळावर ठेवावी
जर फोटो असेल तर पाण्याने पुसून परत तांदळावर ठेवावा.

ॐ शिव जिह्वा समुध्भूतं देववस्त्रविनिर्मितम्॥ आद्यं स्वकुळ साळीनाम जिह्वेशम प्रणमाम्यहम्॥
स्नानमं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे )


खालील मंत्राने हळद , कुंकू , अष्टगंध अर्पण कराव्यात .
1) हरिद्रा समर्पयामि 2) कुंकुम समर्पयामि 3)अष्टगंध समर्पयामि

या मंत्राने जानवे अर्पण करावे .....यज्ञपावित्मं समर्पयामि

फुले दुर्वा हार अर्पण कराव्यात...........पुष्पं दुर्वाकुरमं समर्पयामि

पुढील मंत्राने अत्तर अर्पण करावे ..सुघंधी परिमल द्रव्यम समर्पयामि

उदबत्ती व दिवा ओवाळावा....धूपंम दर्शयामि दिपमं दर्शयामि

 नैवेद्य समर्पयामि..(खालील मंत्र म्हणुन फळाचा व मुख्य  नैवेद्य दाखवावा )
प्राणाय स्वाहा,व्यानाय स्वाहा,उदानाय स्वाहा अपानय स्वाहा,समानाय स्वाहा
ब्रम्हनेन नमा ||


नैवेद्य दाखवुन झाल्यावर खालील मंत्र म्हणुन दोन पळ्या ताम्नात पाणी सोडावे.

१) हात प्रक्षालन........      २)  मुख प्रक्षालन .........

खालील मंत्र म्हणुन अक्षता टाकून नमस्कार करावा
ॐ शिव जिह्वा समुध्भूतं देववस्त्रविनिर्मितम्॥
आद्यं स्वकुळ साळीनाम जिह्वेशम प्रणमाम्यहम्॥
सर्व उपचाराथे अक्षता समर्पयामि ........ नमस्करोमि


माता अंकिनीदेवी व  दशाकिंनीदेवी पुजा

प्रथम चौरंगावरील अंकिनी व दशाकिंनी या जिव्हेश्वरपत्नीच्यां सुपा-या वर  हातात तांदूळ घेऊन
त्यावर खालील मंत्राने अवाहन करून अक्षता अर्पण कराव्यात .

ॐ ब्राम्हपुत्री तपस्विनी| साधना प्रदायनी | शांती वरदायनी |
श्रीजिव्हेश्वरपत्नी  अंकिनीदेवी |  शरणमं प्रपद्ये ||

   
ॐ शारदापुत्री कलानिधी| विद्या प्रदायनी | यश वरदायनी |
श्रीजिव्हेश्वरपत्नी  दशांकिनीदेवी |  शरणमं प्रपद्ये ||


ब्रह्मशारदा पुत्री  अंकिनी दशाकिंनी जिव्हेश्वरपत्नी अवयामी पूजयामि ||
१) पाद्यं समर्पयामि     २) आचमनं समर्पयामि
( नंतर पाणी भांड्यात टाकावे )

दोन्ही सुपा-या ताम्हनात घेऊन खालील मंत्र म्हणत पाण्याने धुवून परत तांदूळावर ठेवाव्या
स्नानमं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे )

खालील मंत्राने हळद , कुंकू , अष्टगंध अर्पण कराव्यात .
1) हरिद्रा समर्पयामि 2) कुंकुम समर्पयामि 3)अष्टगंध समर्पयामि

पुढील  मंत्राने कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावे......................................वस्त्रमं अर्पयमी. |
पुढील  मंत्राने काजळ अर्पण करावे...नेत्रभूषणार्थे .काजलम प्रतिगृह्यताम् | काजलम समर्पयामि
पुढील  मंत्राने मंगळसूत्र अर्पण करावे...कंठभूषणार्थे .मंगळसूत्रम प्रतिगृह्यताम् | मंगळसूत्र समर्पयामि
पुढील  मंत्राने कंकण अर्पण करावे.हस्तभूषणार्थे .कंकणम प्रतिगृह्यताम् | कंकण समर्पयामि
                                                                
पुढील  मंत्राने जोडवी अर्पण करावे...पदभूषणार्थे जोडवीम प्रतिगृह्यताम् | जोडवी समर्पयामि
या मंत्राने ओटी भरावी .............                     .....सौभाग्य परिमल द्रव्यम समर्पयामि  |
या मंत्राने आरसा दाखवावा...                                      शृंगार दशनार्थे दर्पणम दर्शयामि |
फुले दुर्वा अर्पण कराव्यात................... पुष्पं दुर्वाकुरमं समर्पयामि

पुढील मंत्राने अत्तर अर्पण करावे ..सुघंधी परिमल द्रव्यम समर्पयामि

उदबत्ती व दिवा ओवाळावा....धूपंम दर्शयामि दिपमं दर्शयामि

 नैवेद्य समर्पयामि..(खालील मंत्र म्हणुन फळाचा व मुख्य  नैवेद्य दाखवावा )
प्राणाय स्वाहा,व्यानाय स्वाहा,उदानाय स्वाहा अपानय स्वाहा,समानाय स्वाहा ब्रम्हनेन नमा ||
नैवेद्य दाखवुन झाल्यावर खालील मंत्र म्हणुन दोन पळ्या ताम्नात पाणी सोडावे
१) हात प्रक्षालन........      २)  मुख प्रक्षालन .........

खालील मंत्र म्हणुन अक्षता टाकून नमस्कार करावा
सर्व उपचाराथे अक्षता समर्पयामि ........ नमस्करोमि
ब्राम्ह्पुत्री अंकिनी नामोनामा | शारदापुत्री दशाकिंनी नामोनामा ||


जिव्हेश्वर पुत्राच्या एक एक सुपारीवर चौरंगाच्या उजव्या बाजुने खालील मंत्राच्या
क्रमाने अक्षता (पाकळ्या युक्त)  अर्पण कराव्यात

१)ॐ माताअंकिनीपुत्र लोमहर्ष आवाहयामि पूजयामि |
२)ॐ माताअंकिनीपुत्र चन्द्रकांत आवाहयामि पूजयामि |
३)ॐ माताअंकिनीपुत्र क्षेत्रपाळ आवाहयामि पूजयामि |
४)ॐ माताअंकिनीपुत्र पार्श्वनाथ आवाहयामि पूजयामि |
५)ॐ मातादशाकिंनीपुत्र कैलासभुवन आवाहयामि पूजयामि |
६)ॐ मातादशाकिंनीपुत्र सनातन आवाहयामि पूजयामि |
७)ॐ मातादशाकिंनीपुत्र भाक्तीमान आवाहयामि पूजयामि |
८)ॐ मातादशाकिंनीपुत्र पर्वकाळ आवाहयामि पूजयामि |
९)ॐ मातादशाकिंनीपुत्र दयासागर आवाहयामि पूजयामि |
१०)ॐ मातादशाकिंनीपुत्र अर्चन  आवाहयामि पूजयामि |


इति भ. जिव्हेश्वर परिवार  आवाहयामि पूजयामि (सर्वानां धूप दीप नेवेद्य दाखवावा )

नंतर खालील मंत्र १०८ वेळा  म्हणुन  प्रत्येक वेळी बेल (बेल नसल्यास फुले किवा  अक्षदा )  
 अर्पण करावे व नंतर आरती करावी.

   ॐ अंकिनीदशाकिंनीनाथ जिव्हेश्वरांय नमो नमाः |
         श्री गणपतीची आरती म्हणुन   श्री जिव्हेश्वरांचीं आरती करावी

जिव्हेश्वरांची आरती

जय जय आरती शिवपुत्रा जिव्हेश्वरा | कृपाकरी आता चरणी ठेवितो माथा ||ध्रु||
लज्या रक्षणा घेई आवतारा |
केली वस्त्राची निर्मिती सर्वथा |

जय जय आरती शिवपुत्रा जिव्हेश्वरा | कृपाकरी आता चरणी ठेवितो माथा ||१||
हे साळीयांच्या दातारा |
वेगी धाव घेई आता |
जय जय आरती शिवपुत्रा जिव्हेश्वरा |
कृपाकरी आता चरणी ठेवितो माथा ||२||

जिव्हेश्वरां ची गायत्री-म्हणून अक्षदा टाकाव्यात

ओम जिव्हेश्वराय विद्दम्हे | शिवपुत्राय धीम्हे |
तन्नो सकुल प्रचोदयात ||

माता अंकिनीदशाकिंनीसहित जिव्हेश्वर भगवान की जय..----म्हणून कार्येक्रम संपन्न करावा.

 

Share
अमावस्या अशुभ दिवस आहे काय?
Thursday, 20 June 2013
एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...
गुरुबल कशासाठी बघतात?
Thursday, 20 June 2013
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...
ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
Thursday, 20 June 2013
दशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...
ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?
Thursday, 20 June 2013
ग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...
ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
Thursday, 20 June 2013
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...
खुळ्या वयातली साथसंगत
Thursday, 20 June 2013
जगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...
चि.सौ.सुनबाई,
Thursday, 20 June 2013
हे बघ, "मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन"... "जशी माझी लेक तशी... Read More...
तयारी पहिल्यावहिल्या भेटीची!
Thursday, 20 June 2013
एखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...
परफेक्‍ट पार्टनर'च्या शोधात...
Thursday, 20 June 2013
जोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...
बोहोल्यावर चढण्यापूर्वी..
Thursday, 20 June 2013
ठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...