नरक चतुर्दशी (आश्‍विन वद्य चतुर्दशी) ( Narak chaturdashi)

Share
१. नरक चतुर्दशी …………………..श्रीमद्‌भागवतपुराणात अशी एक कथा आहे - `पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करीत होता. देव व मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा हजार उपवर राजकन्यांना तुरुंगात कोंडून ठेवले व त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाकार उडाला. श्रीकृष्णाला ही बातमी समजताच सत्यभामेसह त्याने असुरावर हल्ला केला. नरकासुराला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्‍त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की, `आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.' कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्‍विन वद्य चतुर्दशी ही नरक चतुर्दशी मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या दिवशी पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्‍ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच नंदाने त्यास मंगलस्नान घातले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्‍त केला.'
 
२. यमतर्पण ………….अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यु निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधि पंचांगात दिलेला असतो. तो पहावा व त्याप्रमाणे विधी करावे. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट पायाने ठेचून उडवितात, तर काही जण त्याचा रस (रक्‍त) जिभेला लावतात. ३. नरकचतुर्दशीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर स्नान का करतात ? …..ब्राह्ममुहूर्तात केले गेलेले स्नान हे 'देवपरंपरा' या श्रेणीत येते व देवपरंपरेमुळे जिवाला पुढील लाभ होतात - अ. शुद्धता, पवित्रता व निर्मळता या प्रकारचे संस्कार होणे आ. ब्राह्ममुहूर्तावर प्रक्षेपित होत असलेले ईश्‍वरी चैतन्य व देवतांच्या लहरी ग्रहण करण्यास समर्थ बनणे.
 
३. ईश्‍वरी चैतन्य ग्रहण होण्यासाठी स्वत:ला दक्ष करणे व ईश्‍वराच्या संकल्प, इच्छा आणि क्रिया या तीन प्रकारच्या शक्‍ती व या तीन शक्‍तींच्या अनुषंगाने ज्ञानशक्‍तीही ग्रहण करता येणे ई. स्नानोत्तर लावण्यात येणारा टिळा दुष्ट शक्‍तींवर सुष्ट शक्‍तींनी मात केल्याचे निदर्शक आहे !
Share
अमावस्या अशुभ दिवस आहे काय?
Thursday, 20 June 2013
एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...
गुरुबल कशासाठी बघतात?
Thursday, 20 June 2013
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...
ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
Thursday, 20 June 2013
दशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...
ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?
Thursday, 20 June 2013
ग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...
ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
Thursday, 20 June 2013
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...
खुळ्या वयातली साथसंगत
Thursday, 20 June 2013
जगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...
चि.सौ.सुनबाई,
Thursday, 20 June 2013
हे बघ, "मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन"... "जशी माझी लेक तशी... Read More...
तयारी पहिल्यावहिल्या भेटीची!
Thursday, 20 June 2013
एखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...
परफेक्‍ट पार्टनर'च्या शोधात...
Thursday, 20 June 2013
जोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...
बोहोल्यावर चढण्यापूर्वी..
Thursday, 20 June 2013
ठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...