नवरात्रात देवीचे घरगुती पुजन (घट बसवणे)

Share

प्रथम गणपती पूजन

प्रथम गणपती मुर्ती किवासुपारी पाण्याने धुऊन व गंध लाऊन तांदळावर ठेऊन पुढील मंत्राने गणपती पूजन करावे.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ | निर्विन्घ कुरमेंदेओ सर्व कार्येषु सर्वदा || आवाहनार्थे अक्षता समर्पयामि
अक्षता, हळदी कुंकू अत्तर, दुर्वाफुले वाहूनधुप दीप दाखवावा. नंतर पुढील मंत्राने गुळखोबरे नेवेद्य दाखवावा.
प्राणाय स्वाहा,व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा अपानय स्वाहा,समानाय स्वाहा ब्रम्हनेन नमा ||

देवीचे पुजन (घट बसवणे)

त्यानंतर पाट मांडून त्यावर वस्त्र टाकून तांदळावरती मूर्ती किवा घट ठेवावा (शेतातल्या मातीसह धान्य पेरून)
सर्वमंगलमांगल्ये शिवेसर्वार्थसाधिके| शरण्ये त्रिम्बकेगौरी नारायणी नमोस्तुते| आवाहनार्थे अक्षता समर्पयामि

पळीने ताम्हनात दोनदा  पाणी सोडून प्रत्यक वेळी क्रमाने खालील मंत्र म्हणावे.

१) पाद्यं समर्पयामि     २) आचमनं समर्पयामि ( नंतर पाणी भांड्यात टाकावे )

दुर्वा घेऊन पुढील मंत्र म्हणत पाण्याने घट किवां मूर्तीवर प्रोक्षण करावे....स्नानमं समर्पयामि .|

दुर्वा घेऊन पुढील मंत्र म्हणत पंचामृतने घट किवां मूर्तीवर प्रोक्षण करावे....पंचामृत स्नानमं समर्पयामि |

खालील मंत्राने हळद , कुंकू , अष्टगंध, सेंदूर अर्पण कराव्यात.
 

1) हरिद्रा समर्पयामि 2) कुंकुम समर्पयामि 3)अष्टगंध समर्पयामि ४)सेंदूर समर्पयामि |

पुढील  मंत्राने कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावे.....वस्त्रमं अर्पयामि. |

पुढील  मंत्राने काजळ अर्पण करावे...नेत्रभूषणार्थे .काजलम प्रतिगृह्यताम् | काजलम समर्पयामि  |

पुढील  मंत्राने मंगळसूत्र अर्पण करावे...कंठभूषणार्थे .मंगळसूत्रम प्रतिगृह्यताम् | मंगळसूत्र समर्पयामि |

पुढील  मंत्राने कंकण अर्पण करावे.हस्तभूषणार्थे .कंकणम प्रतिगृह्यताम् | कंकण समर्पयामि |

पुढील  मंत्राने जोडवी अर्पण करावे...पदभूषणार्थे जोडवीम प्रतिगृह्यताम् | जोडवी समर्पयामि |

या मंत्राने ओटी भरावी ..  सौभाग्य परिमल द्रव्यम समर्पयामि  |

या मंत्राने आरसा दाखवावा...शृंगार दशनार्थे दर्पणम दर्शयामि |
 

पुढील  मंत्राने फुले  दुर्वा अर्पण कराव्यात................... पुष्पं, दुर्वाकुरमं समर्पयामि |

पुढील  मंत्राने फुले  दुर्वा अर्पण कराव्यात................... पुष्पं, दुर्वाकुरमं समर्पयामि |

पुढील  मंत्राने अत्तर व बुक्का अर्पण करावे-----नाना सुगंधी परिमल द्रव्यम समर्पयामि |

उदबत्ती व दिवा ओवाळावा....धूपंम दर्शयामि दिपमं दर्शयामि |

प्राणाय स्वाहा,व्यानाय स्वाहा,उदानाय स्वाहा अपानय स्वाहा,समानाय स्वाहा ब्रम्हनेन नमा ||

नैवेद्य दाखवुन झाल्यावर खालील मंत्र म्हणुन दोन पळ्या ताम्हनात पाणी सोडावे

१) हस्त प्रक्षालन........      २)  मुख प्रक्षालन .........

पुढील मंत्राने पानाच्या विडयावर खारिक,बदाम, हळकुंड,खोबरे.सुपारी ठेऊन दुसऱ्या विड्यावर,

सुपारी व दक्षणा ठेऊन दोन्हीवर पळीने पाणी सोडावे मुखवासार्थे पूगीफलतांबुल समर्पयामि |

 दक्षणा समर्पयामि | खालील मंत्र म्हणुन अक्षता टाकून नमस्कार करावा

सर्व उपचाराथे अक्षता समर्पयामि  | .नमस्करोमि ||

शंख घंटा कलश आणि दीप यावर फक्त गंध व पाकळ्या सहित अक्षताने पूजन करून आरती करावी

 

Share
अमावस्या अशुभ दिवस आहे काय?
Thursday, 20 June 2013
एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...
गुरुबल कशासाठी बघतात?
Thursday, 20 June 2013
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...
ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
Thursday, 20 June 2013
दशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...
ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?
Thursday, 20 June 2013
ग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...
ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
Thursday, 20 June 2013
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...
खुळ्या वयातली साथसंगत
Thursday, 20 June 2013
जगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...
चि.सौ.सुनबाई,
Thursday, 20 June 2013
हे बघ, "मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन"... "जशी माझी लेक तशी... Read More...
तयारी पहिल्यावहिल्या भेटीची!
Thursday, 20 June 2013
एखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...
परफेक्‍ट पार्टनर'च्या शोधात...
Thursday, 20 June 2013
जोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...
बोहोल्यावर चढण्यापूर्वी..
Thursday, 20 June 2013
ठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...