साळी हेच नाव का?

Share

साळी या शब्दाचा उत्पत्तीच्या दॄष्टीने अर्थ तो असा: शाल वॄक्षाची साल साळ्णारे ते साळी, किंवा शाली. ही प्रागैतिहासिक काळातील, समाज हा अर्धनग्न व वन्य अवस्थेत असतानाची घट्ना आहे. मानव वनचर असताना वस्त्रे म्हणून या सालीचाच उपयोग करीत होता. रामायण काळात राम, सीता व लक्ष्मणाने वनवासात जाताना याच सालीची वस्त्रे धारण केली होती. त्यास वल्कले म्हणत.(मराठीत त्यांचे देश्य रुप वाकळ झाले) वस्त्रे विणण्याची कला मानवास, साध्य झाल्यानंतर या साल साळणार्‍या साळ्यांनी स्वीकारली व ते साळी या नावानेच समाजात परिचित राहिले. `शाल' हा शब्द ही या शाल वॄक्षाच्या साली वरूनच प्रचारात आला आहे. ही अतिशय लवचिक असल्याने अंगाभोवती गुंडाळ्ण्यास फारच सोईची आहे. मात्र तिचा आता कोणी उपयोग करीत नाही. शाल वॄक्षाच्या सालीचे काम वॄक्षाच्या सालीचे संरक्षण तसे उघडया नागडया मानवाच्या शरीराचे या सालीद्वारे संरक्षण करणारे ते साळी. भाताच्या साळीस संस्कॄतमध्ये `शाली' हेच नाव आहे. भाताच्या गाभ्याचे संरक्षण करणारी ती साळ. साधर्म्याने मानवाच्या उघडया शरिराचे वस्त्राद्वारे रक्षण करणारे ते साळी.
ॠग्वेदकालानंतर ब्राम्हणकाळात जाती व्यवस्था स्थीर होऊ लागली होती. ती मनुस्मॄतीकाळात घट्ट झाली. एक गोष्ट दिसते ती ही की, प्रागेतिहासिक काळातही ह्या व्यवसायावरून समाजाचे घटक ओळखले जात होते. साळी हा असाच घटक होता.

आता `स्वकुळ' या शब्दाविषयी- यांत स्वकुळ यापासून जोड शब्द झाला आहे. संस्कृतात `स्व' चे पुढिल अर्थ होतात १) स्व = म्हणजे स्वतःचा, २) स्व =म्हणजे उच्चस्थान उदाहरणार्थ-स्वर्ग ३) स्व = म्हणजे चांगला, निर्मळ इ. स्वच्छ म्हणजे ज्याचे अच्छादन म्हणजे, वस्त्र, चांगले उंची आहे (स्व अच्छ = वस्त्र अच्छादन) सारांश, उच्चकुळांना म्हणजे राजेरजवाडे यांना वस्त्रे पुरविणारा तो स्वकुळ साळी, किंवा उंची वस्त्रे निर्माण करणारा तो स्वकुळ साळी.म्हणजे स्वकुळ साळी हा साळ्यांतला एक पोटभेद किंवा उपविभाग झाला.या विभागाने प्रामुख्याने 'रेशमी वस्त्रे' निर्माण करण्याचे स्वीकारलेले दिसते. सामान्यसुती वस्त्रे विणणारा तो साळी या सर्वसमादेशक संज्ञेत येतो. या स्वकुळ साळ्यातही प्रांत परत्वे भेद पडत गेले आणि त्यांनी निर्माण केलेल्या वस्त्रांना प्रांत परत्वे नांवे मिळाली पैठणची ती पैठणी झाली. बनारसची बनारसी शाल झाली. नारायणपेठची ती नारयण पेठी पैठणी झाली. पुरुषांसाठी विशेषतः पुरोहितासाठी वापरली जाणारी वस्त्रे पितांबर,मुकुटे आदी सोवळी वस्ते झाली. 

आर्याच्या प्रथमच पाच टोळ्या ऋग्वेदानुसार या भारतातील सुप्रसिध्द प्रदेशात म्हणजे सिंध, पंजाब, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी आल्या. या आततायी स्वरुपाच्या उग्र लढवय्या टोळ्या होत्या. त्यांनी सिंधू संस्कृतीच्या नागवंशीय, दिवोदास, सुद्रास, सारख्या राजांना जिकून त्यांच्याशी सोयरसंबंध जोडले. मोहंजोदारो आणि हरप्पा येथील उत्खनांत लिंगपुजेचे (३) शिस्नदेव, नागमुर्ती व मातृपूजक देवता सापडल्या आहेत. सांगण्याचे तात्पर्य की शंकर हा आर्याचा देव नाही. त्यास आर्य व आर्यांच्या संकरानंतर आर्यांनी स्वतःच्या किंवा मिश्र हिंदुसंस्कृतीत त्यास आर्यांनी सामील केलेला आहे. ऋग्वेदात शंकर नाही. पिण्ड किंवा लिंग म्हणजे शंकर. मराठीत 'किरडू' या शब्दाचा अर्थ नाग साप असा आहे. 'केर' 'चेर' हे शब्दही नाग या अर्थाचे आहेत. 'केरळ' किंवा 'चेरापुंजी' हे शब्द नागालोकांची वस्तीस्थाने दर्शवितात नागपूर हे किंवा नागाभूमी हे नांगवंशीचांचेच द्दोतक आहेत. आणि तक्षशीला ही नागाची पराभवातली दानभूमी आहे. सांगण्याचा उद्देश ज्या शंकराचा पुत्र जिव्हेश्वर आपण आपला मूळ पुरुष मानतो. किंवा साळ्यांचा मुखिया मानतो. तो नागवंशीय आहे. आम्ही साळी नागवंशीयच आहोत. सिंधू संस्कृतीच्या काळांत वस्त्रे विणण्याची कला पराकोटीला पोहोचलेली होती असे दिसते. कारण तलम रेशमी वस्त्रांचे अवशेष मोहोंजोदरो व हरप्पाच्या उत्खनात सापडले आहेत.

- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे
स्त्रोत - 'स्वकुळ दर्शन' या त्रैमासिकामधुन साभार

Share
अमावस्या अशुभ दिवस आहे काय?
Thursday, 20 June 2013
एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...
गुरुबल कशासाठी बघतात?
Thursday, 20 June 2013
विवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...
ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?
Thursday, 20 June 2013
दशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...
ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?
Thursday, 20 June 2013
ग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...
ग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?
Thursday, 20 June 2013
फायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...
खुळ्या वयातली साथसंगत
Thursday, 20 June 2013
जगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...
चि.सौ.सुनबाई,
Thursday, 20 June 2013
हे बघ, "मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन"... "जशी माझी लेक तशी... Read More...
तयारी पहिल्यावहिल्या भेटीची!
Thursday, 20 June 2013
एखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...
परफेक्‍ट पार्टनर'च्या शोधात...
Thursday, 20 June 2013
जोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...
बोहोल्यावर चढण्यापूर्वी..
Thursday, 20 June 2013
ठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...