ह्.भ.प.श्रीसंत श्रीमती सावित्रीबाई गणपत भंडारे:(नाशिक)
श्रीमती सावित्रीबाई गणपत भंडारे या नाशिक मनपाच्या संत गाडगे महाराज मठातील रूग्नालयात स्टाफ नर्स म्हणुन कार्यरत होत्या. संत गाडगे महारांजाच्या वचनाप्रमाणे त्यांनी रूग्नांची मनोभाअवे सेवा केली.
त्या नाशिक येथील श्री संत निवृतीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त, सिड्को ज्येष्ठ नागरिक महिला मंडळाच्या कार्यकर्त्या असून स्वकुळ साळी ज्ञातीगृह आळंदी या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. आजपर्यंत आळंदीची वारी त्या नियमीत करीत आल्या आहेत. आळंदीच्या साळी समाजाच्या धर्मशाळेच्या त्या ट्रस्टी आहेत. नाशिकच्या कृष्ण्मंदिरात त्यांचे नियमीत पोथीवाचन चालु असते. अत्यंत गोड आवाजात त्या भजन व भक्तीगीते गातात. लहाणपणापासूनच त्यांना हरीभक्तीचे वेड आहे. भ. जिव्हेश्वर आणि संत ज्ञानेश्वर यांच्या कृपाप्रसादाने हरीनामाचे महावस्त्र परिधान केले आहे. वारकरी दिंडी, भागवत सप्ताहात सहभाग, प्रासादिक भजने म्हणणे ज्ञानेश्वरीचे पारायणे करणे ही त्यांची नित्य कर्तव्य आहेत. श्रीनिवृतीनाथ वारकरी, शिक्षणसंस्था नाशिकतर्फे त्यांना ओम वारकरी कार्यकर्ती म्हणुन पुरस्कारही मिळाला आहे.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे