ह.भ.प.श्री.अनगानंदपुरी महाराज साळी (सोलापूर)
ह.भ.प. काशीनाथ विठ्ठलराव क्षीरसागर हे साळी समाजाचे सिद्ध पुरूष असून त्यांना अनगानंदपुरी महाराज म्हणुन ओळखले जाते. त्यांनी गीताभारतीकडुन गुरूदीक्षा घेतली. ते मेहबूब नगर जिल्ह्यातील दामरगिद्धीचे राहणारे असून १९६३ मध्ये सोलापूर येथे आले. पत्नीच्या मृत्युनंतर त्यांना विरक्ती आली होती. त्यांना मूलबाळ काहीच झाले नव्हते. सोलापूर येथे आल्यावर त्यांनी अशोक चौकातील हनुमान मंदिरात वास्तव्य केले. तेथे त्यांनी १९६९ मध्ये गीतापाठशाला सुरू केली. ते दासबोध, विचारसागर आदी विषंयावर प्रवचने नित्यनेमाने देत असत.
लहानपणापासुनच जंगमगुरूच्या सान्निध्यात राहिल्याने शिस्तीचे धडे त्यांना मिळाले होते. हंप्पी येथील गुरूगुंटी मठातही त्यांचे वास्तव्य होते. त्यांना मराठी, कन्नड, तेलगू व हिन्दी या भाषा चांगल्या येतात.
- संकलन
जिव्हेश्वर.कॉम टिम
मुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे