स्वामी विरजानंद महाराज यांचे प्रवचन संपन्न
सिडको (नाशिक) - वस्त्र कलेचे आध्य निर्माते व साळी समाजाचे आराध्य दैवत भ.श्री.जिव्हेश्वर यांच्या वंशातील स्वामी विरजानंद महाराज यांचे प्रवचन दि. ८-९-२०१५ मंगळवार रोजी सायंकाळी गणेश चौक, नवीन सिडको, नाशिक येथे संपन्न झाले.
सदाचार व दुराचार ह्या दोन्हीही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीत असून त्यातील सदाचारीवृत्तीचा अवलंब मोठ्या प्रमाणात भ.श्री.जिव्हेश्वर यांच्या वंशातील साळी बांधवांनी करावा. दुराचार करण्यासाठी मंथन करावे लागत नाही परंतु सदाचारासाठी वेळोवेळी मंथन करुन एका निर्णयापर्यंत यावे लागते व त्यातुनच पुरषार्थाची प्राप्ती होते. प्रवचनात कटु उदाहरण दिल्यास ते वैयक्तिक घेउ नये. मात्र त्यावर विचार मंथन केल्यास त्याचे उत्तर स्वतः मध्येच सापडेल. त्यामु़ळे लोकांनी चांगल्या विचारांची पेरणी आपल्या हृदयात करावी असे भावपुर्ण आवाहन स्वामी विरजानंद यांनी केले.
बालकास माता ९ महिने उदरात धारण करते. त्या मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी माता व पिता जिवंत असताना त्यांची सेवा करावी. परंतु ते हयात नसताना समाज सेवा करुन ऋण मुक्त व्हावे. पितरांच्या ऋण मुक्ततेसाठी कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाची गरज नाही. असे त्यांनी सप्रमाण स्पष्ट करुन दुर्गम भागातील गोरगरिबांसाठी जुने कपडे, औषधे व चष्म्यांचे दान मागितले. श्री.डॉ. धमके यांनी त्यांच्या आवाहनास समाजातर्फे प्रतिसाद दिला.
स्वामीजींचे स्वागत श्री.प्रकाश दिवाणे यांनी केले तर प्रास्ताविक श्री.जगन्नाथ एलगट (साळी) यांनी करताना नाशिक शहरातील साळी समाजाच्या कार्याची माहिती दिली. तर आभार श्री.देवेंद्र धरम (साळी) यांनी मानले.
नर्मदा परिक्रमेचे साधक व स्वामीजींचे चाहते श्री.आत्माराम कृष्णा कोठवदे, श्री.प्रकाश शंकर कुलकर्णी, विनायक पावटेकर यांनी स्वामीजींचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी श्री. कोठवदे यांनी स्वतःच्या गाडीतून स्वामीजींना नेले. त्र्यंबकेश्वर येथील साळी समाजाची नियोजित धर्मशाळा, साळीबाबांचे मंदिर, कुशावर्त व निरंजनी आखाडा येथे दर्शनानिमित्त भेटी दिल्या तर नाशिक येथील साळी समाजाचे मंदिराबाबत श्री. प्रतापशेठ मानकर, सुभाष जयरंगे, श्रीमती इंदूबाई धारणकर, सौ.मीना रोडे यांनी मंदिरांची माहिती दिली.
स्वामीजी दि ११ शुक्रवार प्रर्यंत श्री. जगन्नाथ एलगट यांचे निवासस्थानी मुक्कामास होते. त्यावेळी त्यांचे आदरातिथ्य सौ.भारती, कु.प्राची व प्रणिता एलगट यांनी केले.
मुळ लेखन - श्री.जगन्नाथ एलगट (साळी), जिव्हेश्वर कृपा, एन ८ / ई १/ २१ / १, गणेश चौक, नवीन सिडको, नाशिक ४२२००९, मोबा.-९२२६२१८१०६, फोनः (०२५३) २३७०६१३