अपूर्ण
जन्मला कि मरेपर्यंत जबाबदारी
पडे शिरावरी प्रत्येकावरी भूवरी
जन्मलो नसतो जरी मी
उपकार मानले असते देवापरी
आश्वर्य वाटते ह्या जबाबदारीचे
मोकळे आईबाप जन्म देऊन एकदाचे
कर्तव्य कर्मा, भिऊनी जनलज्जेस, पोसती
कर्टी कशीही, माया करिती पुरती
शहाणा सवरता माणूस झटकतो
अंग चोरुनी सटकतो
पडली तरी जीवनाची जबाबदारी पूर्ण
देवावर विश्वास माझा पूर्ण
तो काहीही करी, माझे मनोरथ अपूर्ण
अपूर्णात पूर्ण, दु:खात सुख भरले संपूर्ण...!
१४-९-१९७० (पंढरी)