कोषागार महिमा
कोषागार, कोषागारातच उपकोषागार
कोषागाराचा महिमा अपरंपार
जो तो येण्या आधी होतो गार
लाल शाईच्या भितीने होतो गारेगार
विविध स्वरुपाची अनंत कामे
उगाच करती ठो ठो कोषागाराच्या नामे
ककदृष्टी सार्यांची कोषागारावर
आपणांशी आपण पहा अगोदर
कामाचा रोज ढिगारा
को. का. कर्मचारी मरतो बिचारा
देयका, डिपॉझिट स्टॅंप अन पेन्शन
डि.ए.टी., डी.डी.ए.टी., ए.जी. च्या तपासणीचे टेन्शन
कोषागारात कामाची गर्दी
बिल मिळण्यासाठी प्रथम गर्दी
कामाचा आदर्श अकौंट जाण्यावर
रात्रंदिवस डोळे फोडून गेल्यावर
टी.ओ.,ए.टी.ओ. चे नाते
कर्मचार्याशी कौंटुंबिक नाते
सगळ्यांनी कोषागाराची नाव
वल्हवून नेऊ एफ.डी.चे पार
प्रत्येकाचे खाते जरी वेगळे
निवृत्तीनंतर कोषागाराकडे लागती डोळे
असे आमचे कोषागार तत्पर
जनतेची कामे करुन, आनंद मिळवू सत्वर...!
१२-४-२००७ (सोलापूर)